- 5147 views
जानेवारी २००८,
नुकताच ऑफिसात येऊन जागेवर टेकलो होतो. आज महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं.
पीसी वर काम सुरू केलं तोच मोबाइलवर संदेश झळकला! "Wife" बायकोचा होता. कॉन्टॅक्ट मध्ये आमची नावं Wife आणि Hubby अशी सेव्ह केलेली आहेत. उघडून वाचला-
" Cant talk, forgot the ATM PIN. please SMS. Urgent."
आयला वेंधळी कुठली, आणि आता एवढं अर्जंट काय आहे? जाऊदे, बोलू संध्याकाळी, असं म्हणत डायरी उघडून शोधून तिचा पीन मोबाइल वरून पाठवला.
संध्याकाळी घरी पोहचून फ्रेश होत होतो तेवढ्यात बायको पण आली. आल्या आल्या बॉम्बं टाकला " अरे सकाळी ऑफिसला जाताना माझी पर्स हरवली. पैसे काही जास्त नव्हते पण एटिएम आणि मोबाइल होते त्यातच."