- 6636 views
लेक्चरला निघालेल्या अर्णवला थांबवून नेहाने विचारले,
"आज संध्याकाळी पिक्चरला जाऊयात ? "
"सॉरी आज मी देव सरांकडे नोट्स घेण्यासाठी जाणार आहे, चल बाय."
हिरमुसल्या नेहाकडे न बघता तो पुढे निघाला.
अतिशय हुशार आणि देखण्या अर्णवच्या मागे अनेक मुली होत्या पण तो सगळयांपासून लांबच रहायचा.
मात्र गेल्या काही दिवसांपासून काहीतरी अनपेक्षितसं त्याच्यासोबत घडत होतं..
तुकडया- तुकडयांतील त्याचं आयुष्य, एका व्यक्तीने एखाद्या जिग्सॉ पझल प्रमाणे एकसंध जोडून
त्याला परिपूर्ण केलं होतं.
अर्णव प्रेमात पडला होता.
पहिल्यांदाच.
सोलमेट वगैरे काही नसतं, ती प्रेमिकांनी तयार केलेली केवळ एक रोमँटिक संकल्पना आहे असे मानणाऱ्या
त्याचीही आता खात्री पटली होती,
प्रो.देवाशिष मध्ये अर्णवला त्याचा सोलमेट मिळाला होता...