विंडोज १०: एक धावता आढावा

विंडोज १०: एक धावता आढावा

माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली. दरम्यान यावर बरेच लेख जालावर लिहिले गेले आणि त्यात खालील मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला.

१) विंडोज प्रणाली ८/८.१ अस्तित्वात होती,मग ९ कुठे गेली ?

२) विंडोज ८+ आणि १० मध्ये काय मोठा फरक करण्यात आला.

३) त्यांचा ब्राउजर IE11 बदलावासा का वाटला?
नवीन ब्राउजर "EDGE" आल्यावर तो फोनचा 'नेटिव'/डिफॅाल्ट ब्राउजर झाल्यावर IE 11 चे काय होणार.

४) बोलण्यावरून आज्ञा देणारी "Cortana" प्रणाली अगोदरच होती तिची व्यापकता किती वाढवली आहे

५) सर्व मोबाइल / लॅपटॅाप / पिसी तसेच कीबोर्ड / टचस्क्रीन / माउस यासाठी एकच आणि बिझनेससाठी एकमेकास जोडले जाण्यासाठी "OneDrive" या विंडोज १० मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे तो किती यशस्वी झाला आहे.

६) आतापर्यंत सॅाप्टवेअर विकून पैसे कमवणारी कंपनी जर असे फुकट देऊ लागली तर भवितव्य काय? आडमार्गाने नंतर फी सुरू करणार का? (२००४ साली नेटस्केप या दुसय्रा एका कंपनी चा ब्राउजर धडाधड डाइनलोड होतो हे पाहून इक्सप्लोरर फुकट वाटण्यावरून माइक्रोसोफ्ट कंपनीस " व्यापार मक्तेदारी विरोधी"न्यालयात दावा लागला त्याला उत्तर द्यावे लागले होते.यानंतर मुख्य बिलगेटस यांनी प्रमुखपद सोडले होते.यावरची एक डॅक्युमेंटरी टिव्हीवर नुकतीच दाखवण्यात आली होती.)

७) नवीन प्रमुख सत्त्या नडेला यांच्या धोरणांतर्गत कंपनीने पावले उचलली आहेत त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

काही लिंक्स -

यावर्षी नवीन प्रणाली असलेलेच मोबाइल /टॅबलेट वगैरे येतीलच परंतू जुन्या प्रणाली अपग्रेड करायचे कामही सुरू झाले आहे. माझा यात विंडोज ८.१ चा मोबाइल वापरत असल्याने उत्सुकता व्यतिरिक्त काहीच अनुभव नाही, केवळ नेटवरचे वाचलेले इथे आणण्याचा एक प्रयत्न केला आहे.

एकूण रिव्ह्यूतील विचार पाहता मी अपग्रेड न करण्याचाच निर्णय घेतला आहे. कारण

  • एज ब्राउजर पाहिजेच असं काही नाही.
  • कोर्टाना 'Cortana' ची व्यापकता वाढल्याने विशेष काही फरक नाही.
  • बिझनेसकरता "Onedrive" आहे त्याचा सामान्य मोबाइलधारकास उपयोग नाही आणि ८.१ मध्ये आहेच.
  • फोटोवर काही लिहून पॅावरपॅाइंटसाठी तयार करणे यासाठी अॅप आहेच.
  • रेडिओ रेकॅार्डींगठीसाठी लागणारा माइक्रोफोन विं ७ नंतर काढलाच आहे.
  • वेबपेज सेविंग सुविधाही ७ नंतर बंदच आहे.

नवीन प्रणालीतील दोष यथावकाश दूर होतीलही तोपर्यंत आपले अनुभव आणि शंका विचारण्यासाठी एखादा धागा असावा म्हणून हा प्रपंच. आपण यात भर टाकाल आणि चुका दुरूस्त करालच.

खालील चित्रे जालावरून साभारः

WT