- 5337 views
क्लबहाऊसमध्ये सोसायटीच्या आवारात कोणते देऊळ उभारायचे यासाठी सदस्यांची मीटिंग सुरू होती.
"मारूतीचे देऊळ बांधूया" बिराजदार म्हणाले.
"नको. मारूतीमंदीर म्हणजे खेड्यात असल्यासारखं वाटतं" जोशी म्हणाले.
"दत्तमंदीरच पाहिजे" पराडकरांची सूचना.
"दत्त, विठोबा असल्या देवांची देवळे म्हणजे एखाद्या जुन्या पेठेत राहिल्यासारखं वाटेल" इति गोखले.
"रामाचे देऊळ बांधू." संघात जाणार्या देशपांंड्यांनी प्रस्ताव मांडला.
"अजिबात नको. रामाच्या देवळामुळे देशात प्रॉब्लेम झालेत." त्वेषाने लिमये उद्गारले.
"महालक्ष्मीचे देऊळ सगळ्यांना आवडेल" ही सौ. भोसल्यांची सूचना लगेच फेटाळली गेली.
"दत्त, मारूती, विठ्ठल, राम, देवी असे जुनेपुराणे देव नको. आपल्याला इंटेलिजंट, सुशिक्षित, पॉलिश्ड असा देव पाहिजे. बाकीचे देव आपल्या पॉश सोसायटीला शोभणार नाहीत." अध्यक्ष म्हणाले.
सर्वसंमतीने गणपतीचे देऊळ बांधायचे ठरले.