[शतशब्द कथा स्पर्धा] त्याग

माझे डोके उठले होते.समोर भकास तोंडाने अण्णा, तात्या बसले होते. ते दोघ्ं माधुकरी मागून आले होते. मिरजेच्या स्टेशनकड़े माझे मन धावे, तिथून वाराणसीला,माझ्या देवाकडे! पिंडितला शेखर नाही जिताजागता चंद्रशेखर आझाद.

"अण्णा ही भिक्षा कशी शिजवणार??"

उंबरठ्यात कृष्णा येऊन लाकडे भिजवुन गेली होती. मनातल्या क्रांतिकाऱ्याने बंधने झुगारली.
"द्या इकडे भिक्षा",

तांदूळ तपेलीत घेऊन सुटलो. दूर एक केशरी ठिपका,तिकडे वळलो, जवळ जाता ऊब जाणवली, भानावर आलो. स्मशानतले एक सरण . त्याला त्या पावसाळी रात्री तेच उबदार होते. तपेली मी सरणाच्या विस्तुत ठेवली अन मागून हादरलेला अण्णाचा आवाज "राम अरे चिता आहे ती!".
दोन भाऊ, शिजते अन्न, उबदार चिता ह्यांच्या साक्षीने मी क्रांतिधर्म स्वीकारला,

अन केला सर्वस्वाचा

त्याग