- 10696 views
सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे.
त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि आपापल्या गेटकड़े वळले. तो अचानक थबकून, उगाच बैगमध्ये शोधाशोध करत थांबलेल्या तिच्याकडे वळला.
" आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?"
" पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?"
" I think you need a helping hand stopping your hand from changing songs."
ती चमकून बघतच राहिली.