[शतशब्दकथा स्पर्धा] शाळा

ही काय पद्धत आहे लोकांशी वागण्याची?
श्वेतांबरा बाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता. भितीने जणू अद्रुश्य झाला तो..
काय केले होते त्याने? एका छोट्याश्या मुलीला ती हरवलेली असताना मदत केली होती. बाईंचा तास सोडून...
त्यांची शाळा होतीही तशी मोठी..सरदारांच्या वाड्यातच भरायची.
कोपर्यात बसून रडणार्या त्याला बाई समजावू लागल्या..हे बघ, शाळेचे काही नियम आहेत ते पाळायला नकोत का? वेताळे गुरुजींना कळले तर तुझे काही खरे नाही!
तुला आवडली की नाही ती मुलगी? "हो"! मग ती इथे यायला हवी की नाही? "हो"!
मग तिने वाड्यात हरवायला नको का???
त्याच्या चेहर्यावर मंद हसू पसरले...श्वेतांबरा बाईंच्या खोबण्याही आसुरी लाल प्रकाशानी उजळून निघाल्या...