- 6325 views
हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा.
त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही .
बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता .
आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते .
पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती .
समोरचा चेवून हाणत होता, बापासारखाच . मी गुमान मार खात होतो . बाप खूष .त्याचा रेट वाढत होता . मी जिंकणार हे त्याला नक्की माहित होते .
आणि एकदाचा वार जिव्हारी लागला आणि मी कोसळलो .
थडग्यात आई शेजारी शांत पहुडलोय .माझ्याकडे आई कौतुकानी बघतेय ….
मी तीला लहान भावा वर शेवट पर्यंत हात न उचलण्याचे वचन पाळले म्हणून !!!!!