- 5540 views
पारावर चार म्हातारी टकुरी काय ती असायची. पन कालपास्नं सरकारनं निर्णय घेतल्यावर गावतली तरणीबी जमा होवु लागली.
शिरप्या:- इच्चीभनं त्या सरकारच्या...
झिपर्या:- सालं आमची मजा सरकारला बगवली नाय...
मंद्या:- येकदम ८५७ साईटा बंद. पर काल आल्तं पेपरमंदी साईटा पुन्हा चालु झाल्याती.
गणप्या:- म्या म्हंतु आपन तालुक्याला जावुया..
शिरप्या:- कश्यापाई ?
गणप्या:- काय ते म्हंतात न्हवं माहिती अधिकार. सगली माहिती म्हंने जगतेला द्यावी लागत्ये.
मंद्या:- मंग तु काय इचारनार?
गणप्या:- माजं ठारलं. म्या निंघालो.
शिरप्या:- आरं तु काय इचारनार पन?
गणप्या वराडला " लई कंटाळा आलाय त्याच त्याच साईटा बगुनशान. त्या ८५७ साईटांचे लिस्ट मला पायजेलं.
सगळी पोरं गपगार.