- 7804 views
द लॉस्ट रेलिक्स

"खरेतर अशोकानंतर लगेचच मौर्यसाम्राज्याची पडझड झाली , त्याआधी बांधलेल्या लेण्यांपैकी ही एक !" प्रो.लँग्डन तल्लीनतेने सांगत होते.
"पण मग अशोकाने जमावलेल्या बुध्दिस्ट रेलिक्सचे काय झाले ? " स्तुप न्याहाळत सोफीने विचारले.
"उत्तरेतले स्तुपाखालील सगळे रेलिक्स नष्ट झाले , इथे स्तुपच दगडी असल्याने खाली काही ठेवता येणे शक्यच नव्हते "
"पण हर्मिकेवर ठेवले असेल तर ?"
प्रोफेसरांचे डोळे चमकले !
सोफीने वेदीवर चढत लाकडी नक्षी उचकटुन काढली , त्याखाली तिला एक जीर्ण भुर्जपत्र सापडले . नक्षी परत लावुन ती खाली उतरली .
प्रो.लँग्डन ह्यांनी थरथरतच तो ब्राह्मी संदेश वाचला .... दोनच शब्द...
" हेच ते "
आणि ते एकाग्रतेने नक्षीकडे पहात म्हणाले "सोफी , बुध्दाने स्वहस्ते बनवलेल्या गोष्टींना आपण असं धसमुसळेपणाने हाताळत नाही !"

_____________________________________________________________________
अवांतर :
१) संपुर्ण कथा काल्पनिक !
२) सर्व प्रकाशचित्रे मिसळपाव.कॉम ह्या वेबसाईट वरुन साभार !!