- 3517 views
बंटी ससुल्या आणि भोलू माकडोबा एकमेकांचे जिवलग मित्र. बंटी तिथे भोलू हे सगळ्या जंगलाला ठाउक होते.
बंटी कोवळी गाजरे तोडत असला की भोलू झाडावरुन आजूबाजूला लक्ष ठेवायचा. जरासा धोका दिसला तरी बंटीला सावध करायचा.
काळू कोल्हाने बंटीला पकडायचे अनेक प्रयत्न केले होते. प्रत्येकवेळी भोलू मुळे बंटी त्याच्या तावडीतून अलगद निसटत असे.
एकदातर काळू पानांचा अंगरखा घालून बंटीच्या वाटेवर दबा धरुन बसला होता. बेसावध बंटी काळूच्या तावडीत जवळजवळ सापडणारच.... तेवढ्यात....
भोलूने झाडावरचा एक मोठा पेरु काळूला फे़कुन मारला. काळू दचकला.... तेवढ्यात बंटी तिकडून निसटला.
काळूला झाडावर चढता येत नसल्याने काळू भोलूला काहिही करु शकत नव्हता.
एकदिवस काळूला एक नामी संधी मिळते.........
पैजारबुवा,