- 5270 views
काल पण परत सतराव्यांदा का अठराव्यांदा त्यांचा फोन आला.तसा तो गेल्या आठवड्यापासून येत होताच.पण गेले ३-४ दिवस मात्र त्याची वारंवारता वाढली होती.
त्यांच्या राज्यातील, आमच्या नविन कामासाठी, त्यांचे पण काही मजूर घ्यावेत, अशी त्यांची विनंती होती.
हप्ता हेच त्या मागचे खरे कारण.
शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष लावावा असा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर आजची भेट नक्की केली.
मजूर आम्हाला नकोच होते पण त्यांना काहीतरी चिरीमिरी द्यायलाच लागणार होती.ते माझ्याच जाती-धर्माचे असल्याने, कंपनीने तडजोडीची जबाबदारी माझ्यावरच सोपवली.
हो नाही करता, ५०,०००/- रु. प्रति महिना असा हप्त्याचा दर ठरला आणि आम्ही दोघेही म्हणालो."ABCDEFG."