[जवळजवळ दोन] वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकरांनीच ठेवलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत.
मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून!
या स्पर्धेच्या दोन फेर्या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- [तारीख१] ते [तारीख१५] या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे.
- जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.)
- [तारीख१६] ते [तारीख२०] मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील.
- [तारीख१६] ते [तारीख२०] या दरम्यान परीक्षकही तीन कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.
अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील
- [तारीख२१] ते [तारीख३०] मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!
- वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात.
- [तारीख३१] नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील.
- वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील.
विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि [मानपत्र] देण्यात येईल.
येणार्या दर्जेदार कथांचं परीक्षण करायला परीक्षकही तितकेच समर्थ पाहिजेत. या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेतः
[- शतशब्दकथा हा वाङ्मयप्रकार मिपाला देणार्या आतिवास]
[- अनेक शतशब्दकथा लिहिणारे आणि "शतशब्दकथा कशी लिहावी" यावर धागा काढून मार्गदर्शन करणारे खेडूत]
[- स्वतः लेखिका असलेल्या विशाखा पाटील]
... आणि "+१" असा प्रतिसाद देऊन लेखकांचा उत्साह द्विगुणित करणारे वाचक-मिपाकर!
(सहभागी होऊ इच्छिणार्या लेखकांसाठी सूचना: काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.)