आक्षेपार्ह वावर आणि भाषा

बाहेर कॅप्टन नी टाकलेल्या साहित्य संपादकिय आवाहनात मुख्य नाराजीचा सूर हा अवांतर, ट्रोलिंग बद्दल आहे. चांगल्या लोकांना ही गोष्ट मिपा वरचा वावर कमी करण्याइतकी किंवा अगदी निघुन जाण्याइतकी दखलपात्र वाटते आहे. अनाहिताबद्दल पण आजवर अनेकदा ट्रोलिंग आणि दंगा घालायच्या हेतुने काही बाही लिहिलं गेलंय. त्यातलं बरंचसं फाट्यावर मारण्याजोगं असलं तरी कुठवर हा प्रश्न आहेच. लोकांना लिहितं करायचं असेल आणि इथला वावर सुखद करायचा असेल तर काही प्रमाणात याला आळा बसायलाच हवा. हे लिहायला निमित् झालं एका अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहीलेल्या खरडीचं.
काही निमित्ताने ही खरड माझ्या आज लक्षात आली. टका च्या ख व मध्ये प्रगो ने हे लिहिलंयः यातली भाषा आक्षेपार्ह आहेच पण अर्थ सुद्धा अतिशय गलिच्छ निघतोय. हा आयडी बॅन का होत नाहीये?

प्रगो
Wed, 08/07/2015 - 17:16
अहो ते तसे नसते ... 'टवाळ ' थायलंड ट्रिप आयोजित करण्यात आली आहे असे म्हणल्यावर जे जे येतात ते सारेच अंक्लिद्य सनावृता फॅन्स ;)

प्रगो
Wed, 08/07/2015 - 16:47
मला खरे तर एकटेही जायला आवडेल ... आपले कोणावाचुन अडले नाय पायजेल

पण

जमलेच तर सगळ्या अंक्लिद्य सनावृता TM मंडळाला घेवुन जाऊ , धमाल करु =)

या दालनात मिपाचे बरेचसे जुने जाणते सभासद आहेत. म्हणुन नेहमीसारखा नीलकांतना व्यनि न करता इथे धागा टाकला आहे. मला कल्पना आहे की कारवाई नेहमी होत असते आणि ती होत नाही म्हणुन हा धागा काढलेला नाही.