नमस्कार मंडळी,
साहित्य संपादक मंडळ जेंव्हा अस्तित्वात आलं तेंव्ह नव्या लेखकांना उत्तेजन देणे, त्यांना लिहीते करणे आणि दर्जेदार लेखन जास्तीत जास्त प्रकाशात राहील यासाठी प्रयत्न करणे हे पण उद्देश होते.
आपण तांत्रिक काम करतोय पण हे उद्देश बाजुला पडतायेत का असं मला काही गोष्टी पाहुन वाटलं. काही संपादक पण येऊन बोलले. आपण यासाठी काय करु शकतो? पंतांच्या दखल सदराबद्दल सुचना आणि काम वाटप करुन घेणे हे तर आपण करुच पण वरच्या ३ गोष्टींसाठी काय करुयात? एवढ्यात कामाच्या रेट्यामुळे आणि माझ्या वैयक्तिक विसा डॉक्युमेंटेशन च्या कामामुळे मला फार लक्ष घालता आलेलं नाही गेला आठवडा. ख. फ. वर येणं होतं पण जिथे शांतपणे बसुन काही लिहायचं असेल किंवा नवीन सुधारणांसाठी विचार करुन मांडायचं असेल ते होत नाहीये. पण आजपासून मी ते बदलणार आहे. पण मला पण अजुन ठोस सुचलं नाहीये यावर काही उपाय. शिवाय कामवाटपाबद्दल एक सांगावंसं वाटतं की विषयवार काम विभागुन घेण्यापेक्षा आपण एक आठवडा एक टाईमझोन, दुसरा आठवडा दुसरा टाईम झोन मध्ये असणारे लोकं सगळी कामं करतील असं बघु. म्हणजे, मी , पंत आणि आता आदुबाळ (यु एस मध्येच असतात ना?) हे एका वेळेत ऑनलाईन असतात. एक आठवडा आम्ही सगळी तांत्रिक कामं पार पाडु. बाकीचे लोकं तेंव्हा तांत्रिक कामातून निवांत असतील आणि तो वेळ बाकीच्या सुधारणांसाठी लक्ष ठेवुन असतील. पुढच्या आठवड्यात स्वॅप्स, चिमणराव हे एकाच वेळेत ऑनलाईन असतात. तसंच मधुरा आणि विशाखा ताई एकमेकींबरोबर जास्त असतात. आपण हे एकमेकांच्या सोयीनुसार ठरवू. पण एका वेळी २-३ जण तांत्रिक कामात लक्ष घालत असले तर बाकीचे बाकी काही विचार क्र्रु शकतील. त्या आठवड्यात एखाद्याला जमत नसेल तर दुसरा कुणी करेल. शिवाय आपण त्या त्या महिन्याचा धागा अपडेट करत राहूच. अर्थात दर आठवड्याला काही सुधारणांचा धडाका चालु राहणार नाही पण विचार करायला मोकळा वेळ मिळेल हे निश्चित. आलेला प्रत्येक धागा हल्ली प्रत्येक जण वाचतोय कारण त्यात सुधारणा करायच्या आहेत. यात सगळ्यांचा वेळ जाण्यपेक्षा तो विभागुन घेऊ.
अनेक चांगल्या लेखांवर आपल्यापैकी सगळ्यांचे प्रतिसाद नाहीयेत, यात मी पण आले. ते ही कमी करु.
आणखी एक मागे प डलेलं काम म्हणजे: "तसेच येत्या काळात मिपावर काही नवीन साहित्यप्रकार जोडण्याचा विचार आहे त्यासाठी सुध्दा येथे चर्चा करता येईल." या ही बद्दल आपण इथे बोलु.
आपली चर्चा पूर्ण झाली की ठरलेल्या निर्णयांचं मी संकलन करुन अजुन एक धागा काढेल म्हणजे सगळे मुद्दे एकत्र राहतील.
आणखी एक, ही माझी वैयक्तिक मतं आहेत की कामं मागे पडतायेत. असं नसु शकेल पण तसं नसेल तर ते ही सांगा. तुम्ही वैयक्तिक पातळीवर काही प्रयत्न केले असतील तर ते ही इथे लिहा. ते पुढे चालु ठेवता येईल आणि त्याला सांघिक स्वरुप आलं तर अजुन ठोस परिणाम पण दिसतील.