चाचणीसाठी मदत हवी

नमस्कार,

मिळालेल्या अभिप्रायांवरून असे ठरले होते की सध्या आहे त्या गमभन सोबत मिसळपाववर लिहीण्यासाठी अन्य दोन पर्याय उपलब्ध करून द्यावेत.

आपण आतापर्यंत विकसीत केलेल्या नवीन मॉड्युल मध्ये प्रत्येक सदस्याला आपल्या खात्याच्या सेटींग मध्ये जाऊन आपल्याला हवा तो लेआऊट सिलेक्ट करता येईल. त्यानुसार तुम्ही गमभन, गुगल मराठी आणि इस्क्रिप्ट पध्दतीने लिहीता येईल.

मला आता मदत हवी आहे ती ह्या मॉड्युलच्या चाचणीसाठी. सध्या मिसळपावच्या चाचणी संकेतस्थळावर हे मॉड्युल लावले आहे. मला ते मॉड्युल ठीक चालतंय का त्याची चाचणी करायची आहे.

सुरूवातीला मिसळपाववर आल्यावर लॉग इन करण्यासाठी गमभन असेल. आत आल्यावर तुम्ही निवडलेल्या प्रकाराने लिहू शकाल.

१) मिसळपावचे चाचणी संकेतस्थळ येथे आहे. - http://www.misalpav.com/test/
२) लॉग इन करा.
३) माझे खाते मध्ये जाऊन हवा तो लेआऊट निवडा.
४) शक्य तेवढ्या वेगवेगळ्या जागी लिहून बघा. भाषा इंग्रजीशी बदलून बघा.
५) पेज रिलोड झाल्यावर निवडलेल्या लेआऊट मध्ये बदल होतो का?
६) कूठे मराठी लिहीता येते ? कुठे येत नाही अश्या प्रकारे रिपोर्ट करता येईल.
७) अन्य काही अडचण जाणवली का?

हे चाचणी संकेतस्थळ परवा म्हणजे ४ जुलैपर्यंत सक्रिय असेल.

धन्यवाद.