सुधीर काळे यांचेसोबतचा व्यनि संवाद

नमस्कार,

येथे हे श्री सुधिर काळे आणि माझ्यातील व्य नि संवाद समोर ठेवत आहे. तुम्हा सर्वांचे काय मत आहे?

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Between you and सुधीर काळे
सुधीर काळे's picture
सुधीर काळे May 30

मिटवा Block

वरील विषयावर आपण मागविलेल्या विनंतीनुसार मी आपलविनंतीमा़झा feedback दिला होता. त्यावर कुठलीच प्रतिक्रिया आपल्याकडून आली नाहीं. मी लिहिलेली मते मान्य आहेत कीं नाहींत व मान्य असल्यास त्याबद्दल कांहीं कारवाई करण्याचा विचार आहे कीं नाहीं हेही कळले नाहीं. तरी याबद्दल मला जरूर लिहावे.
सुधीर काळे's picture
सुधीर काळे May 30

मिटवा Block

वरील विषयावर आपण मागविलेल्या विनंतीनुसार मी आपल्याला मा़झा feedback दिला होता. त्यावर कुठलीच प्रतिक्रिया आपल्याकडून आली नाहीं. मी लिहिलेली मते मान्य आहेत कीं नाहींत व मान्य असल्यास त्याबद्दल कांहीं कारवाई करण्याचा विचार आहे कीं नाहीं हेही कळले नाहीं. तरी याबद्दल मला जरूर लिहावे.
नीलकांत's picture
You May 31

मिटवा

नमस्कार,
तुम्ही आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अभिप्रायाला एवढा भरभरून प्रतिसाद आलाय. आणि कितीतरी अनपेक्षीत अडचणी लोकांनी बोलून दाखवल्या आहेत.
मिपावरील वातावरणाबाबत तुम्ही बोलून दाखवलेल्या काळजीबाबत सहमत आहे. येत्या काळात ही समस्या दूर व्हावी असे करायचे ठरले आहे. मात्र ही बाब अस्पष्ट असते. म्हणजे यात तातडीने चुक बरोबर असे आखता येत नाही. त्यामुळे मिपाच्या व्यवस्थापनात अधिकाधीक लोक सहभागी करण्याचे ठरले आहे. त्यामुळे सध्याच्या मंडळाचा परीघ वाढेल अधिक काळजीपुर्वक नियोजन करता येईल.

याशिवाय अधिक सविस्तर प्रतिसाद तुमच्या अभिप्रायाला सविस्तर उत्तर देईल तेव्हा लिहीतो. आता मात्र मिपाची तांत्रीक बांधणी करतोय त्यात जरा व्यस्त आहे. पुन्हा एकदा तुमच्या अभिप्रायासाठी धन्यवाद. मिपा तुमच्यासारख्या लेखकांमुळेच समृध्द आहे याची जाणीव कायमच आहे.

- नीलकांत
सुधीर काळे's picture
सुधीर काळे May 31

मिटवा Block

धन्यवाद! पण एक इशारा.....
व्यवस्थापन जितके जाडजूड तितकेच ते निर्णय घेण्यास अकार्यक्षम असते! त्यामुळे असे न करता आपले नियमच बदलावेत. मागे एक-दोघांना काढून टाकताना जसे तडफदार निर्णय घेतले होते तसे घ्यायला हवेत. सध्या मोडक यांची गँग कार्यरत दिसत नाहीं, निंबाळकरही बाहेर काढले गेले आहेत. असे करणेच योग्य आहे. मोडकसाहेब सध्या हयातच नाहींत असे कानावर आले होते ते खरे आहे काय?
असो. तुमच्या निर्णयाची वाट पहातो.....
नीलकांत's picture
You Jun 1

मिटवा

नमस्कार,
फक्त व्यवस्थापनच मोठे होतेय असे नाही. तर लेखन करणार्‍या लोकांना मदत करण्यासाठी लोकांनाच जास्तीचे अधिकार देण्याचा विचार आहे. म्हणजे येणारे लेखन उत्तम येईल लेखन करणार्‍या कुणाला काही अडचण आल्यास त्यांना मदत उपलब्ध असेल.

स्व.श्रावण मोडकांना जाऊन परवा (३० मे) दोन वर्षे झालीत. :(
सुधीर काळे's picture
सुधीर काळे Jun 21

मिटवा Block

नीलकांत, नमस्कार!
आता मा़झ्या शेवटच्या प्रतिसादाला तीन आठवडे झालेत. उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
सुधीर काळे's picture
सुधीर काळे Jun 24

मिटवा Block

कांहीं प्रगती झाली का?
नीलकांत's picture
You Jun 29

मिटवा

मी १ जुन रोजी तुम्हाला उत्तर दिले आहे.
सुधीर काळे's picture
सुधीर काळे 9 min ago

मिटवा Block

"फक्त व्यवस्थापनच मोठे होतेय असे नाही. तर लेखन करणार्‍या लोकांना मदत करण्यासाठी लोकांनाच जास्तीचे अधिकार देण्याचा विचार आहे. म्हणजे येणारे लेखन उत्तम येईल लेखन करणार्‍या कुणाला काही अडचण आल्यास त्यांना मदत उपलब्ध असेल." याचा अर्थच कळला नाहीं! कारण मी लिहिले होते कीं व्यवस्थापन जितके जाडजूड तितकेच ते निर्णय घेण्यास अकार्यक्षम असते! त्यामुळे असे न करता आपले नियमच बदलावेत. या माझ्या मुद्द्याला उत्तर द्याल या प्रतीक्षेत मी होतो. पण आता पुन्हा नाहीं विचारणार! CEO एकच असावा लागतो व त्याचे मंत्रीमंडळहही छोटेच असावे लागते नाहीं तर 'कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाहीं' अशी परिस्थिती उद्भवते.
सुधीर काळे's picture
सुधीर काळे 2 min ago

मिटवा Block

नीलकांत-जी, मी दिलेल्या feedbackची प्रत मी ठेवली नव्हती. ती तुमच्याकडून मिळेल काय?
नीलकांत's picture
You 1 min ago

मिटवा

नमस्कार,
मी प्रयत्न करतोय. पण तुमच्या व्यनि मधुन मी म्हणतो तसे होऊद्या असा सुर दिसतोय. जेव्हा की मी माझ्याने शक्य तेवढे करतोय. तुम्ही मिपावर पुर्वग्रह घेऊन येणार असाल किंवा सशर्त येणार असाल तर मी काय म्हणावे?
- नीलकांत
नीलकांत's picture
You 1 sec ago

मिटवा

देतो. तुमच्या प्रतिसादाची प्रत देण्यास हरकत नाही. सध्या मी मिसळपाववर मराठी लिहीण्याच्या पध्दतीत बदल करण्यात जरा व्यस्त आहे. तरी एक दोन दिवसात देतो.