मिपा हॉल ऑफ फेम माहिती संकलन

श्री. आदूबाळ यांच्या मिपा-साहित्य-मौक्तिके अर्थात मिपाचा अनमोल खजिना या धाग्यातील चर्चेप्रमाणे मिपा हॉल ऑफ फेम माहिती संकलन प्रकल्पाच्या प्रूफ ऑफ कॉन्सेप्टसाठी हा धागा सुरु करत आहे.

खालील गूगल फॉर्म हा एका वेळी एकाच लेखमालिकेचे दुवे व इतर माहिती संकलित करण्यासाठी बनवला आहे. जर एखाद्या मिपाकराने ५ लेखमालिका लिहिल्या असतील तर पाच वेळा हा फॉर्म त्या लेखमालिकांसाठी भरावा लागेल.

बिल्ला क्र. ३०० म्हणजे सदस्य छोटा डॉन यांच्या मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास या लेखमालिकेच्या चार भागांचे नोड क्र.अनुक्रमे 1362, 1364, 1379, 1411 असे आहेत.

लेखमालिका प्रकार - मी इथे ललित निवडेन. चारच भाग असल्याने भाग क्र. ५ ते २५ यांचे उत्तर द्यायची गरज नाही.

मालिका पूर्णत्वाबाबतचा प्रश्नाचे उत्तर देणे अनिवार्य ठेवलेले नाही. सदर बाब शेवटच्या भागाचा नोड क्र. वापरून सादरीकरणाच्या पूर्वीही बघता येईलच.

प्रश्नांबाबत किंवा लेखनप्रकारांबात काही सूचवण्या असल्यास अवश्य सुचवा. बिल्ला व नोड क्र. रोमन लिपीतच लिहा. अ‍ॅड्रेसबारमधून कॉपी केल्यास आपोआप तसे होईलच.

काही प्रश्न असल्यास येथे प्रतिसादाद्वारे विचारा.

सध्या नावनोंदणी झालेले स्वयंसेवक

खाली फॉर्म एम्बेड केला आहे. काही कारणाने दिसत नसल्यास फॉर्मचा दुवा वापरून डेटा एन्ट्री करू शकता.

मिपा हॉफ ऑफ फेम माहिती संकलन Form is loading...

ज्यांना या कामात हातभार लावायचा आहे त्यांनी प्रथम या धाग्यावरील प्रतिसाद देऊन पुढचे १०० सदस्य क्रमांक निवडावेत. जेणे करून दोन स्वयंसेवक एकच माहिती संकलित करणार नाहीत.

ज्या लेखमालिका २५ हून अधिक भागांच्या आहेत त्यांच्या भाग क्र. २६ पासून पुढील भागांसाठी पुन्हा फॉर्म भरावा. मला अशा तीन लेखमालिका ठाऊक आहेत (व्हीके यांची नशिब, खुशी यांची परिक्रमा व अत्रुप्त यांची गुरुजींचे भावविश्व).

आतापर्यंत संकलित झालेली माहिती या स्प्रेडशीटमध्ये बघता येईल.

तसेच सांख्यिकी विश्लेषण या दुव्यावर बघता येईल.
आपल्या सूचवण्या व सहभागाच्या प्रतिक्षेत.