नमस्कार मंडळी,
साहित्य संपादनाच्या कामासाठी आपली १० जणांची टीम आहे.
सर्वांनीच सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कामाचे वाटप केले तर अधिक परिणामकारकपणे रिझल्ट्स देता येतील. तसेच काही जणांवरच कामाचा बोजा पडतोय अशी परिस्थिती निर्माण होणार नाही.
वाटून घेतलेल्या कामांची अदला बदल ठराविक काळाने करता येईलच जेणे करून यांत्रिकपणा येणार नाही.
आपण मुख्यत्वे करत असलेली कामे:
- धाग्यातील लिंक्स, फोटोज व फॉर्मॅटिंग दुरुस्त करणे / सुधारणे
- टंकनचुका व व्याकरणाच्या चुका दुरुस्त करणे
- सदस्यांनी खरडी व संदेशांद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे किंवा लेखन दुरुस्त करून देणे.
- श्रीगणेश लेखमाला किंवा आगामी अंकासाठी काम करणे
आपण ज्या टाइमझोनमध्ये असतो त्यानुसारदेखील तासांचे वाटप व्हायला हवे. भारतातल्या रात्रीच्या वेळच्या संपादनाची पूर्ण जबाबदारी उत्तर अमेरिका व युरोपमध्ये राहणारे मिपाकर घेऊ शकतात.
तसेच लेखनप्रकारानुसारही काही वाटप होऊ शकते. जसे मिपावर नवे सदस्य कविता प्रकाशित करत असतील तर माझ्यासारखे त्यांना काहीच मार्गदर्शन करू शकणार नाहीत.
हे वाटप झाले म्हणून उपलब्धतेची लवचीकता संपायला नको हाही विचार आहेच.
तर मंडळी आपापल्या सूचना, विचार व उपलब्धता येऊ द्या.