यंदाच्या श्रीगणेश लेखमालेचं स्वरूप

गणेश चतुर्थीला शंभर नव्वद दिवस राहिलेले आहेत. यंदाच्या लेखमालेचं स्वरूप कसं असावं याची चर्चा करण्यासाठी, वेगवेगळ्या कल्पना मांडण्यासाठी हा धागा काढत आहे.

----
कल्पना १:

मिपावर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतात. लिहितात. माझ्या माहितीच्या मिपाकरांची क्षेत्रं आठवून पाहिली तर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (सोन्याबापू) ते भाषाशास्त्रज्ञ (पियुशा पिशी अबोली) ते गुरुजी (अत्रुप्त) ते दंतवैद्य (अजया) असा विस्तीर्ण पट दिसतो. (आणखीही इंट्रेष्टिंग लोक-कार्यक्षेत्रं असतील - माहीत नाही.) मिपावर अकादमी, गुरुजींचं भाव-विश्व, राजाराम-सीताराम, पूर्वेच्या समुद्रात, आळश्यांचा राजा यांची एक लेखमाला अशा आपापल्या कार्यक्षेत्राशी निगडित लेखमालाही आल्या आहेत, लोकप्रिय झाल्या आहेत.

यंदाच्या श्रीगणेश लेखमालेत वेगवेगळ्या क्षेत्रातले दहा मिपाकर निवडून त्यांना आपापल्या व्यवसायाबद्दल लिहितं केलं तर?

करियर विशेषांक वगैरे प्रकारांत असतं तसं व्यवसायाचं कोरडं वर्णन अर्थातच अपेक्षित नाही. पब्लिक बोर होईल. शिक्षणाचं स्वरूप, शिकतानाचे बरेवाईट अनुभव, काम करतानाचे अनुभव, हा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी लागणारे गुण, वगैरेबद्दल हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेलं वाचकांना नक्कीच आवडू शकेल.

लोकांना लिहितं करण्याचं उद्दिष्टही पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्राबद्दल लिहायचं असल्याने लोक भरभरून, आत्मीयतेने लिहितील. मिपाकर किती बहुपैलू आहेत याचंही प्रदर्शन होईल.

(फक्त दहा लोकांना लिहितं करायचं तर लोकांना पुरेसा वेळ दिला पाहिजे.)

----

अजून कल्पना सुचल्या तर लिहीन.

____

.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;}
.tg td{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;padding:10px 5px;border-style:solid;border-width:1px;overflow:hidden;word-break:normal;}
.tg th{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;font-weight:normal;padding:10px 5px;border-style:solid;border-width:1px;overflow:hidden;word-break:normal;}
.tg .tg-ipa1{font-weight:bold;background-color:#c0c0c0;text-align:center}

क्र०
आयडी
कार्यक्षेत्र
हँडलर
अपडेट

1
मृत्युंजय
कंपनी सेक्रेटरी
आदूबाळ
लिहीत आहेत

2
सोन्याबापू
निमलष्करी दल
कॅप्टन जॅक स्पॅरो
लिहीत आहेत

3
बॅटमॅन, प्रगो
Data scientist / सांख्यकीतज्ञ
अन्या दातार
बॅटमॅनशी संपर्क झाला आहे

4
पिशी अबोली
भाषा शास्त्रज्ञ
स्रुजा पैसा
लिहीत आहे

5
बाबा पाटील, प्रास
आयुर्वेद / व्यवसाय
अन्या दातार
प्रास यांचा लेख आला आहे

6
विवेक पटाईत
प्रधानमंत्री कार्यालय
आदूबाळ
होल्ड (गोपनीयतेच्या कारणास्तव)

7
विशाखा पाटील
प्राध्यापिका / लेखिका
विशाखा पाटील

8
प्रभाकर पेठकर
हॉटेल व्यवसाय
प्रभाकर पेठकर
लेख आला आहे

9
आतिवास
जेंडर स्पेशालिस्ट
आदूबाळ
वेळेअभावी होल्ड

10
दमडी
पोलीस सबइन्स्पेक्टर
मितान
लिहीत आहेत

11
चित्रगुप्त
चित्रकला

12
स्वॅप्स
छायाचित्रण

13
मितान
(बाल)मानसशास्त्र (चाईल्ड सायकॉलॉजी)
पैसा

14
बोका-ए-आझम
प्राध्यापक
अजया
लेख आला आहे

15
कॅप्टन जॅक स्पॅरो
मेकॅनिकल इंजिनिअर
कॅप्टन जॅक स्पॅरो

16
लाल टोपी
योगशिक्षक
आदूबाळ
लेख आला आहे

17
भीडस्त
दंतवैद्य
अजया
लिहीत आहेत

18
अन्या दातार
अभियंता
अन्या दातार
लेख आला आहे

19

20

हँडलर कोने? कोने हँडलर?