मिसळपावच्या व्यवस्थापनात वेगवेगळया भूमिकेत असलेल्या सर्वांना एकत्रित येऊन चर्चा व संवादासाठी ही खास जागा. आपण आपल्या कामाच्या बाबतीत वेगवेगळ्या दालनांत चर्चा करीत असलो तरी एकत्रित संवादाशिवाय आपली टीम जमायला वेळ लागेल. त्यामुळे कामाची विभागणी असावी मात्र टीम मिपा एकत्रित चर्चा करीत असावी असा विचार आहे.
येथे मिपा सल्लागार, संपादक, साहित्य संपादक, तांत्रीक टीम, विशेषांकाची टीम, मिपाचे हितचिंतक आदी सर्वांना या दालनात प्रवेश देता येईल. तसेच ज्या लोकांनी मिपाचे काम करायचे थांबवले आहे त्यांना सुध्दा येथे प्रवेश देता येईल. म्हणजे त्यांच्या सल्ल्याचा लाभ पुढे सुध्दा होत राहील. एकंदरीत मिपाची पुढची वाटचाल कशी असावी हे येथे ठरवता येईल. तेही संपादकीय किंवा तांत्रीक चर्चा टाळून. म्हणजे हवे तसे करता येईल. अन्य लोकांना संपादकांशी किंवा तांत्रीक टीमशी येथे संवाद साधायला हरकत नाही.
येथे उत्तम चर्चा व्हावी आणि टीम बिल्टअप व्हावी अशी अपेक्षा आहे.