गणेश चतुर्थीला शंभर दिवस राहिलेले आहेत. यंदाच्या लेखमालेचं स्वरूप कसं असावं याची चर्चा करण्यासाठी, वेगवेगळ्या कल्पना मांडण्यासाठी हा धागा काढत आहे.
----
कल्पना १:
मिपावर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतात. लिहितात. माझ्या माहितीच्या मिपाकरांची क्षेत्रं आठवून पाहिली तर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (सोन्याबापू) ते भाषाशास्त्रज्ञ (पियुशा पिशी अबोली) ते गुरुजी (अत्रुप्त) ते दंतवैद्य (अजया) असा विस्तीर्ण पट दिसतो. (आणखीही इंट्रेष्टिंग लोक-कार्यक्षेत्रं असतील - माहीत नाही.) मिपावर अकादमी, गुरुजींचं भाव-विश्व, राजाराम-सीताराम, पूर्वेच्या समुद्रात, आळश्यांचा राजा यांची एक लेखमाला अशा आपापल्या कार्यक्षेत्राशी निगडित लेखमालाही आल्या आहेत, लोकप्रिय झाल्या आहेत.
यंदाच्या श्रीगणेश लेखमालेत वेगवेगळ्या क्षेत्रातले दहा मिपाकर निवडून त्यांना आपापल्या व्यवसायाबद्दल लिहितं केलं तर?
करियर विशेषांक वगैरे प्रकारांत असतं तसं व्यवसायाचं कोरडं वर्णन अर्थातच अपेक्षित नाही. पब्लिक बोर होईल. शिक्षणाचं स्वरूप, शिकतानाचे बरेवाईट अनुभव, काम करतानाचे अनुभव, हा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी लागणारे गुण, वगैरेबद्दल हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेलं वाचकांना नक्कीच आवडू शकेल.
लोकांना लिहितं करण्याचं उद्दिष्टही पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्राबद्दल लिहायचं असल्याने लोक भरभरून, आत्मीयतेने लिहितील. मिपाकर किती बहुपैलू आहेत याचंही प्रदर्शन होईल.
(फक्त दहा लोकांना लिहितं करायचं तर लोकांना पुरेसा वेळ दिला पाहिजे.)
----
अजून कल्पना सुचल्या तर लिहीन.
____
.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;}
.tg td{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;padding:10px 5px;border-style:solid;border-width:1px;overflow:hidden;word-break:normal;}
.tg th{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;font-weight:normal;padding:10px 5px;border-style:solid;border-width:1px;overflow:hidden;word-break:normal;}
.tg .tg-ipa1{font-weight:bold;background-color:#c0c0c0;text-align:center}
क्र०
आयडी
कार्यक्षेत्र
हँडलर
1
मृत्युंजय
कंपनी सेक्रेटरी
आदूबाळ
2
सोन्याबापू
निमलष्करी दल
3
बॅटमॅन, प्रगो
Data scientist / सांख्यकीतज्ञ
अन्या दातार
4
पिशी अबोली
भाषा शास्त्रज्ञ
5
बाबा पाटील, प्रास
आयुर्वेद / व्यवसाय
अन्या दातार
6
विवेक पटाईत
प्रधानमंत्री कार्यालय
7
विशाखा पाटील
प्राध्यापिका / लेखिका
8
दीपक कुवेत
शेफ?
9
आतिवास
आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित काहीतरी (नक्की ठाऊक नाही.)
10
रमताराम
11
चित्रगुप्त
चित्रकला
12
स्वॅप्स
छायाचित्रण
13
मितान
(बाल)मानसशास्त्र (चाईल्ड सायकॉलॉजी)
14
बोका-ए-आझम
समाजशास्त्र / इतिहास? (प्राध्यापक आहेत)
15
कॅप्टन जॅक स्पॅरो
16
चिगो
सनदी अधिकारी
17
18
19
20