नमस्कार,
आज तुम्हासर्वांचे मिपावर साहित्यसंपादक म्हणून स्वागत आहे. आजपासून तुम्ही मिसळपाववरील सर्वप्रकारचे जाहीर साहित्य प्रकार संपादन करू शकाल. प्रतिक्रिया संपादनाचे अधिकार मात्र वगळण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचा वेळ मिसळपाव वर सकारात्मक काम करण्यात जाईल. आणि तुमच्यापैकी काही लोकांची जी इच्छा होती की वादात पडायचे नाही, ती सुध्दा पुर्ण होईल.
आता आपण नेमके काय करायचे आहे ते बघुया. मिसळपाववर रोज नवनवीन लेखन येत असते. ते चांगले असावे, चांगले दिसावे हे तुमचे मुख्य कार्यक्षेत्र असेल. म्हणजे जर कुणाला लेख लिहायला काही अडचण असेल तर त्याला तुमच्याशी संपर्क करायची सूचना तेथे असेल, सोबतच तुमच्या लक्षात आले की एखादा लेख चुकीचा पडलाय... किंवा लेखात काहीतरी तांत्रीक चुकतंय तर तुम्ही तेथे स्वतःहून दखल घेऊन तो लेख दुरूस्त करणे अपेक्षीत आहे. शक्य झाल्यास लेखकांशी संपर्क साधल्यास उत्तम. लोकांनी स्वत;च लेख योग्य पध्दतीने द्यावा हीच अपेक्षा आहे. नवीन असताना मदत हवी असल्यास खास लोक मदतीस आहेत अशी ही रचना आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक लेखाच्या उजव्या बाजूला संपादन नावाचे बटन दिसेल. संपादन वर गेल्यास आपण लेख बनवताना जशी रचना असते तशी दिसेल. तुम्ही हवे ते बदल करू शकता. कृपया काळजीपुर्वक करावे. तुम्ही एखादा लेख काढून टाकल्यास त्याला रिकव्हर करण्याची सोय नाही. त्यामुळे काळजी घ्या.
ह्यासोबतच यापुढे मिसळपाव वरील सर्वच लेखांचे वर्गीकरण आपण बदलतोय. त्यासाठी नवीन सोय जोडतोय. त्यावर तुम्ही लक्ष द्यावे. ह्या वर्गीकरणाचा फायदा मिसळपाववरील लेखन गुगलमध्ये इन्डेक्स होण्यासाठी होईल आणि मिपावर पुढे साहित्य शोधण्याससुध्दा होईल. ह्या व अश्या सर्वच साहित्य संबंधीत विषयावर तुम्ही आपली मते द्यावीत आणि आवश्यक ते बदल मिपावर होत आहेत हे बघावे अशी अपेक्षा आहे. सध्या तरी मिपाच्या तांत्रीक टीम मध्ये मी आणि प्रशांत एवढेच आहोत. लवकरच नवीन लोक येतील तेव्हा तांत्रीक कामात गती येईल.
मिसळपावचा सध्याचा एडीटर खुप प्राथमिक अवस्थेत आहे. सध्या त्याच्याजागी चांगला पर्याय शोधण्याचे चालले आहे. लवकरच ते होईल तेव्हा त्याच्या डेव्हलपमेंटची गती येथे देत जाईल, त्यावर चर्चा करता येईल.
मिसळपावचे फेसबुकपान आहे. तसेच मिसळपावला SEO साठी मदत करता येईल. मला तुम्ही लोकांनी कुठल्याहीप्रकारे वादात पडलेले नको आहे. तुम्ही लोकांनी नवीन लोकांना लिहीते करणे आणि येत्या काळात आपण एक घोषणा करून जून्या लोकांना सुध्दा परत या असे सांगणार आहोत तेव्हा अश्या तुमच्या संपर्कातील लोकांना सुद्धा तुम्हाला मदत करावी लागणार आहे.
जरी तुम्ही लोकांनी संपादन करू नये असे मी म्हणत असलो तरी तुम्ही मिसळपाव वरील कुठल्याही विषयावर स्पष्ट मत येथे मांडू शकता. कुणालाही कुठल्याही विषयावर येथे बोलण्यात काहीच हरकत नाही. मात्र कृपया येथील चर्चा कुठल्याही स्वरूपात बाहेर जाता कामा नये.
आपल्यापैकी काही लोक एका विशेष साहित्य प्रकाराशी जास्त जुडलेले आहेत त्यांनी त्या त्या साहित्यप्रकारावर जास्त लक्ष देणे अपेक्षीत आहे. त्या त्या साहित्य प्रकारात काही बदल पाहिजे असल्यास येथे चर्चा करता येईल. तसेच येत्या काळात मिपावर काही नवीन साहित्यप्रकार जोडण्याचा विचार आहे त्यासाठी सुध्दा येथे चर्चा करता येईल.
आज येथे
मधुरा देशपांडे
स्रुजा
वेल्लाभट
कॅप्टन जॅक स्पॅरो
श्रीरंग_जोशी
मिसळलेला काव्यप्रेमी
सतिश गावडे
अन्या दातार
आदूबाळ
विशाखा पाटील
किसन शिंदे
प्रशांत
नीलकांत
एवढ्या लोकांना प्रवेश आहे.
- नीलकांत