नमस्कार,
सर्वांचे परत स्वागत आहे. अपर्णाताई व लिमाऊजेट यापुढे चावडीत सोबत नसतील. हा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा.
सध्या येते काही दिवस संपादक सक्रिय केले आहेत याची घोषणा करीत नाही. तुम्ही सुध्दा कुणाला उत्तर देऊ नका. संपादन केले तरी उत्तर मीच देईल.
मिसळपाव वर चांगले साहित्य यावे, आलेले लोक लिहीते व्हावे. नवीन लोकांकडे केवळ डु आयडी असे न बघता त्यांना नवीन असल्याचा फायदा व्हावा त्यांना मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची रॅगींग होऊ नये हा यापुढे व्यवस्थापनाचा महत्वाचा फोकस एरीया असेल. साहित्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी साहित्य संपादनाचे अधिकार काही सदस्यांना देण्याचा व त्यांची तशी टीम तयार करण्याचा विचार आहे.
मिपाची साहित्य ठेवण बदलण्याचा सुध्दा विचार आहे. काही कल्पना असतील तर नक्की सांगा.
- नीलकांत