महाराष्ट्र टाईम्समधे आलेल्या लेखाची लिंक http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/47116332.cms
उपक्रम, मनोगत, मिसळपाव, मी मराठी, ऐलपैल आदी अनेक मराठी वेबसाइट्स आल्या. यापैकी काही साइट बंदसुध्दा झाल्या. उदाहरणार्थ 'मी मराठी' ही वेबसाइट सुरुवातीला जोमाने पुढे आली आणि संपादकीय बेफिकिरीने बंद झाली. 'ऐलपैल' ही चित्तरंजन भट यांची दर्जेदार वेबसाइट कधी आली आणि गेली हे वाचकांना कळलेही नाही. असे असले, तरी या सर्व वेबसाइटनी आपापल्या परीने मराठीस समृध्द केले आहे. प्रत्येक वेबसाइटची ढब ही इतर वेबसाइटपेक्षा वेगळी ठेवण्याचे कसब वेबसाइटच्या संपादकांना आणि लेखकांना अवगत असल्याने वाचकवर्गाचा जास्त फायदा झाला. मिसळपाव हे यादीतील मोठे अपत्य. साधारण चार ते पाच वर्षांपूर्वीपर्यंत ही वेबसाइट 'टॉपर ऑफ द चार्ट' म्हणावी अशी होती. आजही लोकाश्रयात अग्रणी असलेल्या या वेबसाइटला थोडासा साचलेपणा आला आहे. (परंतु वेबसाइटच्या दुनियेत डायनामिक्स कधी बदलेल हे सांगता येत नाही.) ऐसी अक्षरे (http://www.aisiakshare.com/) सारखी संकेतस्थळे साहित्यिक मूल्ये देत आहेत.
--------------------
आदूबाळ:
मिपाचा आस्वाद दोन प्रकारे घेता येतो (किंवा दोन प्रकारे वापर करता येतो):
१. लेखनाचा आस्वाद
२. स्युडो-सोशल-नेटवर्किंग - म्हणजे मिपावर कार्यरत असलेल्या व्यक्तींबरोबर आभासी/प्रत्यक्ष झालेला संवाद
पाच वर्षांपूर्वी मी वाचनमात्र असे. त्यामुळे (२) माझ्यासाठी बाद होतं.
(१) बद्दल बोलायचं झालं, तर तेव्हा लेखनात जास्त वैविध्य जाणवायचं. आपण काय लिहितो आहे याबद्दल एकूणच जास्त काळजी घेतली जात असावी.
पूर्वी मिपावर व्यक्ती - आपल्या गुणदोषांसकट - यायच्या. हल्ली एकाच विचारधारेने प्रेरित झालेले किंवा प्रचार करू इच्छिणारे आयडी येतात. विशेषतः काथ्याकुटांच्या धाग्यांवर हे जास्त जाणवतं.
*****
कंजूस:
मी ५ वर्षे नाही ,वर्षभरातील राजकीय उलथापालथीवर मतं मांडण्यासाठी मिपासारखं योग्य व्यासपीठ दुसरीकडे नाही वैयक्तिक हाणामारी (विखार हो !) न ठेवता मतं मांडतात,
******
पैसा:
आदूबाळ, राग यायचा प्रश्नच नाही. कारण मी स्वतःही ५ वर्षांपूर्वी नव्हते. त्यामुळे जुन्या सगळ्याच लोकांना असं वाटतं का याचा अंदाज घेत होते. एक शक्यता म्हणजे, तेव्हा मिपाही नवीन होतं. तेव्हाचे लोक आता मिपावर फार कमी येतात. मात्र नवीन सत्तत येत अस्तात. तेव्हा येणारं लिखाण मोजकं होतं. आता खूप जास्त प्रमाणात लिखाण येतं. त्यात मग अगदी अहा! असं वाटायला लावणारं कमी होतं. की "ते पुणे गेले" किंवा "हाय गे उज्जेनी!" प्रकारातली ही भावना आहे! समजा तेव्हाच मिपा जास्त चांगलं असेल, तर मग तेव्हाचं पब्लिक टिकून का राहिलं नाही आणि त्यांनी मिपा अजून सुधारावं म्हणून प्रयत्न का केले नाहीत हा प्रश्न राहिलाच!
********
अजया:
साचलेपण हे साहित्यासंबंधी आहे का एकूणच मिसळपाव.काॅम या संस्थळाबाबतीत म्हणता येईल? तसंच मिपामध्ये काय उपक्रम यावेत जेणेकरुन मिपा चाकोरीत अडकल्यासारखे होणार नाही.यावर पण काथ्याकूट व्हावा.जुने काय मिस करतात आणि नव्याना काय हवं आहे याचा विचार होऊन मिपा वाढावे.
***********
अत्रुप्त:
जुनी लोकं लिहायची बंद का झालि? हे ही 1 कोडं आहे.
*********
श्रीरंग जोशी:
चार पाच वर्षांपूर्वीपेक्षा आज मिपाला 'थोडासा' साचलेपणा आलाय हे अक्षरशः काहीच्या काही विधान आहे.
मी २००८ पासून मिपाचा नियमीत वाचक आहे अन २०१२ पासून सक्रीय मिपाकर.
चार पाच वर्षांपूर्वी मिपावर जोमात असलेल्या कुप्रवृत्ती आपल्या कर्माने मिपावरून गायबल्या आहेत. गेली काही वर्षे मिपावरील लेखनाची, चर्चांची व्याप्ती अन सर्वसमावेशकता सहज लक्षात येण्याइतपत वाढत आहे. मुख्य म्हणजे लिहिणार्यांची भर चांगली पडत आहे.
मिपाच्या प्रवासात अनाहिताची निर्मिती खूप मोलाची आहे. अनाहितामुळे अनेक स्त्री लेखक व प्रतिसादक मोकळेपणाने मिपावर वावरू लागले आहेत ही आनंदाची बाब आहे.
मिपावर आजही काही कुप्रवृत्ती आहेतच. बहुतांश मिपाकरांनी अशांना अनुल्लेखाने मारण्याचे धोरण अवलंबिले तर या कुप्रवृत्तीही आपल्या कर्मानेच गायबतील.
**********
रेवती:
पैतै, मागील पानावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिर्यसली सांगायचे तर पूर्वीचे मिपा राहिले नसले तरी मिपा काय किंवा काहीही बदलतच जाणार ना! ते तसे हवे. बदलले नाही तर साचलेपण येणार. फक्त एकच की पूर्वी तक्रारीची दखल लवकर घेतली जायची पण आज तसे होत नाही हे सदस्यांच्या वाढीव संख्येमुळे आहे. लगेच दखल घेतली जाताना त्यामागील जी माणसे कार्यरत असतात त्यांना फार काम पडते हा अनुभव सगळ्यांनाच आहे. मध्यंतरी जसा स्वसंपादन सुविधेचा गैरवापर केला गेला तशाच आणखीही सुविधांचा गैरवापर फार केला गेला/ जातोय म्हणून त्यांचा प्रभाव कमी झालाय. त्यात संमंचा दोष नाही. शेवटी विनामूल्य चालवले संस्थळ आहे. तशी कोणतीच गोष्ट फुकट नसते. त्याची किंमत दुसरे कोणीतरी भरत असते. आज नीलकांत भरत असेल व संमं विनामूल्य काम करत असेल पण सदस्यांची जबाबदारी आहेच! आपल्या कोणत्या मूर्खपणाची/तात्पुरत्या मनोरंजनाची किंमत कोणाला किती भरायला लावायची हे ज्याच्या त्याच्या समंजसपणावर अवलंबून आहे. काही कारणाने धागाच अप्रकाशित झाला व त्यातील आपले प्रतिसाद गेले तर ठीक आहे पण माहित असताना नियमबाह्य प्रतिसाद देऊन संपादकांनी जे अप्रकाशनाचे काम केलेय, त्यावेळी त्यांच्या घरातील महत्वाची दोन कामे अडलेली असतात हे विसरता येत नाही. अशा सदस्यांना इनसेंन्सीटीव म्हणावे लागते.
*******
स्वॅप्सः
आजही लोकाश्रयात अग्रणी असलेल्या या वेबसाइटला थोडासा साचलेपणा आला आहे.
याच्याशी असहमत आहे. असा निष्कर्ष लोक का काढतात हे कळत नाही. दुसरे एक निरीक्षण असे की, नवीन संस्थळ काढणारे आणि मिपावर जास्त सक्रीय नसणारे लोक असं लिहितात. प्रत्यक्ष आजी मिपाकर असं काही मानत नसावेत. आणि मराठी आंजाबद्दल हल्ली येऊन गेलेल्या दोन्ही लेखांत मिपावर अशा स्वरूपाची टीका दिसली. इतर संस्थळांबद्दल टीका नव्हती, आणि स्वतःचे संस्थळ कसे वेगळे आहे यावर भर. आणि त्यातही जास्त रोख हा ते 'मिपा' पेक्षा कसे वेगळे आहे ह्यावर होता.
सकारात्मक टीका केव्हाही चांगलीच. पण मिपा हे फक्त लोकानुयायी आहे आणि म्हणून लोकप्रिय आहे असा ह्या टीकेचा सूर मला चांगलाच खटकला.
______________________
सूड
"साचलेपणा" ची व्याख्या ऐकायला आवडेल आधी!! त्याशिवाय काही बोलू शकत नाही.
आताच जाणवायला लागलेला हा सो कॉल्ड "साचलेपणा" आधी मिपाचा युएसपी होता म्हणे!!
कोण म्हणतंय म्हणून आपण बदलण्यात पॉईंट नाही. आपल्याला स्वतःला बदल हवे असतील तर जरुर करावेत. लोक बोलतच राहणार!!
---------------------
पैसा
माझं म्हणणं पुन्हा एकदा,
मिपा जर ५ वर्षांपूर्वीचं राहिलं नसेल तर ते बदललं आहे. बदल झाला याचा अर्थ साचलेलं नाही.
गेल्या वर्षेच हजर सदस्य ३०/३५ पर्यंत असायचे. हल्ली मिपा २ वेळा दीर्घ काळासाठी बंद राहूनही हजर सदस्य ५०/६० सहज असतात. तोच तो पणा जाणवला तर लोक टिकून रहाणार नाहीत. आता कोणाकडे तेवढा वेळ नाहीये.
आपल्याकडे श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक आधी सुरू झाले होते. आता गेल्या वर्षात त्याबरोबर छायाचित्र स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कथा स्पर्धा घेतल्या अनाहिताचा खास अंक निघाला (तो आंतरजालावरील एकमेव अंक असावा) आणि त्याना छान प्रतिसाद मिळाला. मराठी दिनाच्या निमित्त लेखमालिका झाली. म्हणजे वर्षभर काहीतरी चालू आहे. बुद्धिबळ स्पर्धा अजून व्हायला हव्या आहेत. कोणीतरी आयोजित करायला मदत करा. किंवा बहुगुणींनाच परत विनंती करू. अनाहितातर्फे अजून एकेका विषयावर लिखाण करून मिपा मुख्य बोर्डावर देण्याचा विचार आहे. असे अजून काय उपक्रम करता येतील?
---------------------
कपिलमुनी
टीका सकारात्मक घेतली पाहिजे असे वाटते.
मागे अदितीने केलेल्या टीकेला कवडीइतकी किंमत नाही. पण रामदास काकानी जर ४ शब्द सांगितले असतील तर
ते महत्वाचे आहेत. कारण यांनी मिपाला सार्वजनिकरीत्या प्रेजेंट केलेला आहे.
---------------------
स्नेहांकिता
@कपिलमुनी
ज्याचा मिपावर पुरेसा वावर नाही अशा व्यक्तीला मिपाबद्दल सार्वजनिकरीत्या प्रेझेंट करण्याचा अधिकार नाही असे वाटते. साचलेपणाचा रोख अनिश्चित वाटतो
---------------------
अजया
मिपावर अधिक काय असायला हवं आणि सद्यस्थितीतल्या मिपावरचं काय आवडत नाही असं वाटतं सर्वांना?
साचलेपणा म्हणजे उपक्रमांबाबत का आंतरजालीय साहित्य,चर्चा याबाबत याचीही चर्चा हवी.रामदासकाकांसारखा संस्थळं पाहिलेला माणूस असं म्हणणं आणि लक्तरेवाल्या बाई(चालतं का बाई म्हंटलेलं!!) टीका करणं यात फरक आहेच!
मिपाकरांच्या मनात काही कल्पना असतील तर त्या राबवायला नक्कीच प्रोत्साहन असेल.वेगवेगळ्या उपक्रमांचे स्वागत असेल.असं काही डोक्यात असल्यास नक्की कळवा.
----------------------------
श्रीरंग_जोशी
मिपावरचं काय आवडत नाही
बरेचदा काही सदस्यांचं तेच तेच लेखन (बहुतेक वेळी चर्चाप्रस्ताव किंवा ट्रोलछाप प्रतिसाद) बहुतांश मिपाकरांना रुचत नाही. अशा वेळी सामुदायिक शहाणपण दाखवून त्या लेखनास अनुल्लेखाने मारणे हा माझ्या मते सर्वोत्तम उपाय.
पण दुर्दैवाने दर वेळी काही अतिउत्साही मिपाकर त्या धाग्यावर संधीसाधू नृत्य सुरू करतात अन मग हवशे, गवशे, नवशे त्यात सामिल होतात. त्यामुळे असे लेखन किंवा ट्रोलिंग करणार्यांना नकळत प्रोत्साहन मिळते.
सामुदायिक शहाणपण येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याखेरीज दुसरा उपाय मला तरी सुचत नाही :-( -----------------------
पैसा
मिपावरचे ट्रोल हे बहुतेक राजकीय किंवा ऐतिहासिक धाग्यांवर सापडतात. मग काहीही बोलून ते धाग्याला त्यांना पाहिजे तिकडे वळवतात. ट्रोलांना उत्तर देऊ नका हे सांगून सहसा कोणी ऐकत नाहीत. मधे एकदा अशा ट्रोलाच्या बकवास विधानांचा एक धागा करून दिला होता. तिथे त्याला सगळ्यांनी यथेच्छ झोडपून काढला होता. तेव्हापासून हे महाशय कोणत्याही धाग्यावर स्वतंत्र धागा निघेल एवढी विधाने होणार नाहीत याची काळजी घेतात.
---------------------
कॅप्टन जॅक स्पॅरो
बरेचदा काही सदस्यांचं तेच तेच लेखन (बहुतेक वेळी चर्चाप्रस्ताव किंवा ट्रोलछाप प्रतिसाद) बहुतांश मिपाकरांना रुचत नाही. अशा वेळी सामुदायिक शहाणपण दाखवून त्या लेखनास अनुल्लेखाने मारणे हा माझ्या मते सर्वोत्तम उपाय.
पण दुर्दैवाने दर वेळी काही अतिउत्साही मिपाकर त्या धाग्यावर संधीसाधू नृत्य सुरू करतात अन मग हवशे, गवशे, नवशे त्यात सामिल होतात. त्यामुळे असे लेखन किंवा ट्रोलिंग करणार्यांना नकळत प्रोत्साहन मिळते.
सामुदायिक शहाणपण येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याखेरीज दुसरा उपाय मला तरी सुचत नाही :-( .
ह्यात बर्याचं प्रमाणात मी पण सामील असतो ह्याचं दुख्ख: वाटतयं.
आम्ही असे वागतो असं मान्य आहे पण ते फक्त फाट्यावर मारायच्या लायकीच्या लेखांवरच
--------------------
हाडक्या
Mon, 04/05/2015 - 22:46
काय लिहीलंय त्याला महत्त्व द्यायला हवं म्हणत होते, कुणी लिहीलंय तेही महत्त्वाचं असतं हे मी म्हणत होतो तेव्हा तितकंसं पटलं नाही त्यांना. उदाहरण सापडलं बघा इथेच! ;)
हाहाहा .. है है.. अपुन इधरीच है.. :)
मुद्दा हाच की रामदास म्हणतात म्हणून बरोबर आणि आदिती म्हणते म्हणून चूक (अथवा अग्राह्य) असेही नाही आणि इथे इतकेच म्हणेन की दोन्ही मुद्द्यांचा विचार व्हावा आणि मग चूक की बरोबर ते बोलावे. लक्तरेवाली बाई म्हणून कोणास डिस्कार्ड करणेही चूक आणि रामदास काका म्हणतायत म्हणून ते डिफेंड करणेही चूकच की. :)
माझ्या मते दोघांच्या म्हणण्यात अंशतः तथ्य असले तरी जर ते गेली जवळपास एक-दोन वर्षे मिपावर सक्रिय नसतील तर त्यांचे म्हणणे जसेच्या तसे स्वीकारणे मला मान्य नाही. दोन्ही बाबतीत स्वतःस फार कळते हा अविर्भाव मला जाणवतोय (with all due respect to both of them, हे फक्त त्यांच्या मतासंदर्भात माझे मत आहे).
अर्थात त्यावर चर्चा व विचार होतोय ही बाब चांगलीच.
--------------------------
यशोधरा
चर्चा वाचते आहे. तात्या होता तेव्हाचा मिपाकाल, मध्यंतरीचा लक्तरेवाल्यांचा हम करेसो कायदा मिपाकाल आणि त्यानंतरचे मिपा हे सगळे पाहिले आहे, त्या अनुषंगाने काही लिहावेसे वाटते.
तात्या होता तेह्वा सुरुवातीला सगळेच आलबेल होते असे नाही, तरीही तेव्हा मिपा फार बरे होते. त्यावेळी मिपावरचे लेखनही सद्ध्यापेक्षा चांगले होते, विषयांचे वैविध्य होते. उजवे होते.
मिपाचा चांगुलपणा हळूहळू लयाला जाऊन लक्तरेवाल्यांनी मिपावर मधल्या काळात जणू काही कब्जा केला. मित्रमंडळीत काही चांगली मंडळीही होती, त्यांना साथही देत. ते पाहून अधिक आश्चर्य वाटायचे. कदचित मॉब मेंटॅलिटी काम करत असावी. कहर म्हणजे ह्यात काही मिपाचे सल्लागारही होते व ह्या मंडळींनी चालवलेल्या हैदोसात सहभागीही असत. काही सल्लागार सोयीनुसार मूग गिळून बसले होते. काहीजणांना ह्या मधल्या काळात फार फार त्रास दिला गेला, सार्वजनिक फोरमवर अत्यंत गलिच्छ प्रकारे काहींबद्दल लिहिलेही गेले... :( असो. ह्या काळात बरेच जण सोडून गेले वा यायचे बंद झाले. हा इ-झुंड्शाहीचा परिणाम म्हणायला हरकत नसावी.
पुन्हा आता एकदा मिपा सक्रीय झालेले पाहून बरे वाटते. तरीही लेखनाचा दर्जा तितका उत्तम राहिला नाही हेही नमूद करावेसे वाटते. सकस लेखनापेक्षा धाग्यांवर दंगा करायची प्रवृत्ती अधिक आहे, थोड्याफार प्रमाणात पुन्हा एकदा कंपूशाही तयार होऊ लागली आहे की काय अशी भीती वाटते. तरीही काही उत्तम धागे, लेखमालिकाही पाह़ते, छान वाट्ते उत्तम उपक्रम सुरु झालेत, त्याबद्दल आत्मीयताही वाटते.
मिपाने उत्तरोत्तर प्रगती करावी हीच इच्छा आहे. विचारांपेक्षा व्यक्ती मोठ्या होऊ नहीच, म्हणजे सर्व सुरळीत राहात असावे.
----------------------------------
पैसा
यशो, उत्तम लिहिलेस. तू अगदी सुरुवातीपासून मिपा पाहिलेस त्यामुळे तुझे मत खूप महत्त्वाचे आहे. याबद्दल सगळ्यांनीच मोकळेपणाने मनातले बोलावे ही अपेक्षा आहे. उलट खफवर लिहिणे अडचणीचे वाटले तर कोणी नीलकांतला व्यनि केला तरी चांगले.
चांगल्या लिखाणाबद्दल मला असं वाटतं की सुरुवातीला मोजके लोक केवळ चांगलं काही करू या ईर्षेने आले होते. त्यामुळे चांगले लिखाण जास्त प्रमाणात यायचे. लोक जसे जास्त येतात तसे त्यात हौशे नवशे गवशे सगळे येतात. काही राजकीय किंवा ब्रिगेडी प्रचार इ अजेंडे घेऊनही येतात. काही लोक फक्त टवाळी करण्यासाठीही येतात त्यांना आवर घालण्यात फार वेळ आणि शक्ती खर्च होते. याला मिपा हा टवाळांचा अड्डा आहे असा सुरुवातीला कौतुकाने आणि आता काही हेतूने केलेला प्रचारही कारण असावा. जास्त लोकांपर्यंत पोचण्याची ही किंमत काही प्रमाणात नक्कीच आहे.
या कारणांमुळे सुरुवातीला जर १० पैकी ६ लेख चांगले असतील तर आता २ निघतील. कारण तेव्हा लेख १० असायचे आता २५ येतात. याला उपाय काय करावा? मुद्दाम लेखमालिका लिहून घेणे, चांगले लिहिणार्यांना लिहिते करणे हे नक्कीच करता येईल. काही सुजाण वाचक अनेकदा जे वाचनमात्र असतात त्यांनीही आळस झाडून निदान लिखाण आवडलं इतकी पोचपावती दिली तर चांगले.
मध्यंतरी मिपावर कविता लिहिणे हे जोखमीचे काम झाले होते. आता बर्याच चांगल्या नवीन कविता येत आहेत. त्यांची हेटाळणी होत नाही. एक खासा आयडी बॅन झाल्यानंतर हा फरक पडला आहे. टवाळी झाली नाही की नवीन कवींना लिहायला धीर येतो. हेच सर्व विभागात झाले पाहिजे.