नावात काय आहे ????

नमस्कार !!

नावात काय आहे , असे कुणीतरी म्हणून गेले आहे. पण खरेच का हो नावात काहीच नाही ????
खूप लोकांना आपल्या नावाचा अभिमान असतो, कारण काही ना काही असतेच हो. तसेच आपल्या गावाचा हि अभिमान असतोच, कितीही लहान गाव असू देत पण परमुलुखात त्याचे नाव निघाले की लई म्हणजे लई भारी वाटते . ह्या सोमवारी मुंबई वरून येताना गावाला जाणारी येष्टी मिळाली, म्हटले चला जावू त्याच गाडीने. लहानपण आठवले हो लगेच, प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच गाडीने गावाला जाणे होत होते. एकदम भन्नाट प्रवास असायचा, तो खंडाळ्याचा घाट, लोणावळा चिक्की आणि भिगवण ला जेवायला थांबणे… नुसता सुवर्णकाळ आठवत होतो.

सहप्रवासी मात्र पावसातील गांडूळ असल्यासारखा वळवळत होता. एकतर तो माज्या पेक्षा जास्त अवाढव्य होता, आणि महामंडळाच्या सीट इतक्या आकारमानाच्या लोकांसाठी नसतात. मी स्वताला गोगलगायी प्रमाणे आकसून घेत निद्रा देवीला जवळ केले. हळूहळू प्रवास चालू होता आणि त्याच्या एका प्रश्नाने मात्र गोगल गायीचा बैल झाला !!

भैया बॉम्बे वापस जाने के लिये शाम को आखरी बस कब है ?????

त्याने हिंदी बोलले किंवा मला भैय्या म्हटले त्याचा नाही तर त्याने मुंबई चा उल्लेख बॉम्बे केला ह्याचा.

ह्याच विषयावरून माझा खूप लोकांशी वाद झालेला आहे, ह्यांच्या काय बोबड्या वळतात काय मुंबई बोलायला ? आमच्या जुन्या ऑफिस मधील मार्केटिंग वाल्या गुज्जू सोबत तर रोज ह्या विषयावरून वाजायचे. ती नेहमी बॉम्बे असा नामोल्लेख करत आणि मी तिला चार गोष्टी सुनावत असे.

जास्त कशाला अजूनही काही लोकांना मुंबई पेक्षा बॉम्बे म्हणणे स्टेटस सिम्बॉल वाटते.

पण आम्ही अजूनही त्यांना चार गोष्टी सुनावून मुंबई म्हणा असे बोम्बलत असतो.

साला त्या एका प्रश्ना मुळे खंडाळा द्रुतगती महामार्गावर निद्रा देवी साथ सोडून गेली आणि त्या अजस्त्र मानवासोबत संवाद चालू राहिला. आणि त्या येष्टी मधील काही पाहनीय (प्रेक्षणीय नाही) स्थळ माज्याकडे विस्फारित नजरेने पाहू लागली.