गुड मॉर्निंग

सूर्योदय पाहणे ही एक आनंददायक गोष्ट. आणि समुद्रात उगवत्या सुर्याचे प्रतिबिंब पाहणे अजूनही आनंददायक. मुंबईकर ह्या बाबतीत नशिबवान आहेत. दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये बेलापूरला गुलाबी थंडीत टिपलेले काही फोटो.

सूर्य उगवताना आकाशातील रंगांची छान उधळण.
DSC_0121

सूर्य थोडसा वर आल्यावर दिसणारी उबदार सोनेरी छटा.
DSC_0088

सूर्योदय आणि पक्षी.
DSC_0076_gimp

असाच एक टाईमपास फोटो
DSC_0050

आणि हा आमच्या बेंगलोरचा सूर्य. ह्याला उगवायला रोज धडपड करावी लागते. आम्ही सारखे ट्राफिकमध्ये अडकतो आणि हा ढगांमध्ये. ;)
DSC_0026