नखांची रंगरंगोटी - Nail Art ( Ombre effect i.e. Shades)

आज नखांवर शेडींग करूया. जेव्हा पहिल्यांदा २-३ रंग नखांवर मिसळलेले पाहिलेत तेव्हा काहीतरी मस्त पाहिल्यासारखं वाटलं. मग नेहमीच्या सवयीने गुगलून बघितलं की नक्की करता तरी काय.

तेव्हा कळलं एका साध्याशा गोष्टीने किती मस्त प्रकार करता येता ते. ती गोष्ट म्हणजे Sponge ... याला मराठीत काय म्हणता ते माहित नाही :P

चला तर घ्या तुमच्याकडे असेल तो sponge अगदी किचन मधला पण चालेल. आता एका रंगाचे २-३ शेड्स किंवा कोणताही फिका रंग आणि आपला आवडता पांढरा रंग. मी नेव्ही ब्लू , आकाशी आणि पांढरा घेतलाय. अंदाजे नखावर ३ रंग दिसतील अशा रेघा sponge वर काढा.

Ombre 1

किंवा एक दुसऱ्या पद्धतीने पण करता येईल. एका प्लास्टिक च्या छोट्या डिश मधे दोन रंग थोडे थोडे घ्या. आणि त्यांना जरासं मिसळा. आता त्यावर sponge दाबा.

Ombre 2

हा sponge आता नखावर हळूच दाबा. शेड्स तयार :)

Ombre 3

सगळे नखं सुकल्यावर स्टेप्स रिपीट करा.