वास्तूतील प्रदूषण आणि नैसर्गिक उपाय

परवा टीव्हीवर बातमी बघितली की गावाकडे थंडीच्या हुरडा पार्ट्या चालू झाल्या आहेत, अलोट गर्दी आहे. शहरातील लोक भरभरून गावाकडे येताना दिसतात, त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण शहरातील माणसे गावाकडच्या शुद्ध हवेला, मोकळ्या वातावरणाला, निसर्गातील आनंदाला मुकलेलो आहोत. शहरात खूपच प्रदूषण वाढले आहे. त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही. आपल्या घरातही तितकेच प्रदूषण आहे, हे मात्र आपल्याला माहीतही नसते. तुम्ही म्हणाल, आम्ही तर घरे रोज स्वच्छ करतो, मग आमच्या घरात कसले प्रदूषण?

आपल्या लक्षात येत नाही किती तरी अश्या वस्तू आपल्या घरात रोजच्या रोज अदृश्य प्रदूषण करत असतात. उदा. प्लायचे फर्निचर, वार्निश, भिंतीला लावलेला रंग, सौंदर्यप्रसाधने, गॅस, टीव्ही, ओडोमॉस, उदबत्ती, गुडनाईट, बेगॉन, पेस्ट कन्ट्रोल, टिक-२० अशी अनेक रसायने घरात प्रदूषण करत असतात. या सर्व रसायनाचे बाष्पीभवन होऊन श्वसनाद्वारे ती सतत शरीरात जात असतात. आपल्याला त्याचा सतत त्रास होत असतो, जो लगेच जाणवत नाही.
खाली दिलेल्या तक्त्यात घरातील वस्तू मधून कोणती रसायने बाहेर पडतात ती दिलेली आहेत.

आपण अशा प्रकारची प्रदूषणे सहज टाळू शकतो. त्यासाठी काही झाडांची नावे व चित्र पाठवत आहे. ही झाडे घरातील प्रदूषण कमी करतात, त्याचप्रमाणे कमी प्रकाशात वाढतात. घरच्या थोड्या जागेत लावल्यास वाढतात. ही झाडे बऱ्याच नर्सरीमध्ये मिळतील. घराभोवती जागा असेल तर आजूबाजूच्या परिसरात किंवा घरात जरूर लावा. घरातील प्रदूषण नक्कीच कमी होईल.

याच्या व्यतिरिक्त अनेक मोठी झाडे आहेत जी प्रदूषण कमी करतात खरा तर सगळीच झाडे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात पण हि झाडे घरातून जी रसायने खास करून बाहेर पडतात. ही झाडे लावण्यामागचा उद्देश एकतर ती कमी प्रकाशात वाढतात, आटोपशीर त्यांचा विस्तार राहतो ,प्रदूषण कमी करून घर सजवतात, (मनी प्लान्ट चे झाडाचे चित्र दाखवले नाही कारण ते झाड सगळ्यांना माहित आहे )

याच्या व्यतिरिक्त कोणालाही जास्त माहिती हवी असल्यास (www.flowers of India .com) भेट द्यावी. तुमच्या करता शास्त्रीय नावे दिली आहेत. तरी सापडली नाही तर खाली search window दिलेली असते त्यात बघावे “.झाडे लावा झाडे जगवा.. प्रदूषण मुक्त घर ठेवा”.