जगणे कसले रोज नव्याने मरणे येथे
निष्ठा कसली रात्र उगवता सजणे येथे..
स्वप्नामधली निळी निळाई जाई विरुनी
आयुष्याच्या चिन्ध्या साऱ्या लटकत येथे..
नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी
एक वितीची भूक सजविते सज्जा येथे...
शरीर चिरडत घुमे वासना चढ़त्या रात्री
बुभुक्षितांचे थवे तोड़ती लचके येथे....
रंगीत चेहरे डोळे मोडीत झुले जवानी
रात्रीच्या गर्भातुन ये रात्र च येथे...
-पद्मश्री
( वैशाली हळदणकर चे -बारबाला पुस्तक वाचल्यावर सुचलेली कविता.)

चित्र-पियुशा