तुझी माझी मैत्री
म्हणजे एक उंच झोका असतो,
हसणं असतं,रुसणं असतं,
चिमणीच्या दातांनी तोडलेलं
चिंचेचं बुटुक असतं..
तुझी माझी मैत्री ..
पडणं असतं,सावरणं असतं,
आपलंच खरं करणारं
भांडणही असतं
तुझी माझी मैत्री..
खेळ असतो,वादही असतो,
कुणीच न दिलेला
अधिकार असतो
तुझी माझी मैत्री..
नात्यापलिकडचं नातं असतं,
उसवलेल्या धाग्यांची रफू असते,
तीच मैत्रीला श्रीमंत करते.
तुझी माझी मैत्री..
चित्र-पियुशा