हे विद्यापीठ अमेरिकेतील " कनेक्टिकट " राज्या मधे आहे, खरे सान्गायचे तर या विद्यापीठाचा इतिहास खूपच प्राचिन अहे. याचा मूळ स्रोत इंग्लंड मधिल शिक्षण तज्ञांचा विचार आहे. इथे पदव्यूत्तर शिक्षणासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात, भारतातून येणारे विद्यार्थी ही बहुसंख्य आहेत.आम्ही अर्थात "प्रवासी" म्हणून या विद्यापीठास भेट दिली होती. या विद्यापीठाचा परिसर खूप विस्तिर्ण आहे.विविध शाखांचे शिक्षण इथे दिले जाते.या विद्यापीठाचा जागतिक दर्जा ही उत्तम श्रेणिचा मानला जातो.
गायडेड टूर च्या आधी विजिट सेंटरमध्ये एक वीडिओ दाखविला जातो.त्या मध्ये विद्यापीठाविषयी माहिती दिली जाते.त्या नंतर ठराविक वेळा टूर असतात.या विद्यापीठा मधिल शिक्षण घेणारे विद्यार्थीच गाईड असतात.साधारण पण ४५ मिनिटाच्या या पायी टूर मध्ये विद्यापीठाचा प्रमुख भाग दाखविला जातो.माहिती व इतिहास सांगितला जातो. कांही सक्सेस स्टोरीज पण सांगितल्या जातात.पूर्ण विद्यापीठ पहायला १ किंवा २ दिवस लागतील.विद्यापीठाच्या वेब साईट वर संपूर्ण माहिती उपलब्ध आहेच. वेळ नक्किच कमी पडतो.
मला आवडलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या इमारतींचे वैषिष्ट्यपूर्ण स्थापत्य. त्यावर असणारि इंग्रजी शैली ची छाप पूर्णपणे जाणवते.त्या मुळे ,व मला छायाचित्रणाची आवड असल्यामुळे मला व्यक्तीशः तिथल्या स्थापत्याच्या रचना, वापरलेला तांबूस रंगाचा दगड, विटांचा सुरेख वापर ,आकाशात घुसणारे इमारतींचे मनोरे इत्यादी गोष्टी खूपच भावल्या.शिवाय अमेरिकन संस्क्रुतीला साजेसा हिरवळीचा, फूलझाडांचा ,शोभेच्या झाडांचा, आणि महाकाय व्रुक्षांचा
मुबलक वापर नयन सुख नक्किच मिळवून देतो.तिकडच्या विद्यापीठांना जागेची कमतरता नसतेच. त्या मुळेच द्रुष्टीचा व्यापकपणा वाढतो.
तिथल्या ग्रंथालयाचे प्रमुख वैषिष्ट्य म्हणजे पुस्तकांची प्रचंड विपुलता आणि प्राचिनता. अगदी बायबलच्या छोट्या प्रती,
हस्तलिखिते इ. लक्ष वेधून घेतात.इमारतिच्या बाहेरिल बाजूस केलेला संगमरवराचा केलेला सुरेख वापर ,जो शास्त्रीय आहे, कौतुकास्पद आहे. संगमरवरामधून प्रकाश झिरपतो ,त्या मुळे पुस्तकांचे आयुष्य वाढते. .माझ्या प्र.चि. मध्ये तुम्हाला ते दिसेल.कांही हस्तलिखितांचे नमुने ही प्र.चि. मध्ये दिसतिल.
मला व्यक्तिशः हे विद्यापीठ आवडले. प्रवासातील इतर स्थळां बद्दल परत कधितरी लिहीन.
ग्रंथालयाचा अंतर्भाग
हस्तलिखिताचा नमुना.
टूर>>>>>>>>
चेहर्यांची वैषिष्ट्ये पहा.....
सुरेख रचनात्मक लोहशिल्प......
माझी वैयक्तीक पसंती.........