आवतण ओरिगामी प्रदर्शनाचं

|| श्री गुरवे नम: ||

ओरिगामी प्रदर्शनाचं निमंत्रण

ओरिगामी मित्र आणि कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान आयोजित
ओरिगामी प्रदर्शन - ‘वंडरफोल्ड २०१४’
सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, (छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ, म. फुले मार्केटसमोर) या ठिकाणी
गुरुवार, दि. ११ डिसेंबर ते रविवार १४ डिसेंबर २०१४ या दिवसांत सकाळी ११ ते संध्या. ६पर्यंत आहे.

सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार, मित्रांसह जरूर या.

या वर्षीच्या प्रदर्शनाची मुख्य कल्पना आहे ‘जेवणाचं टेबल’. सर्व ओरिगामी मित्रांनी जेवणाची भांडीकुंडी, काटेचमचे, अगदी जेवणाचे पदार्थही बनवले आहेत... अर्थात कागदापासून. याशिवाय प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार इतर ओरि-कलाकृती बनवल्या आहेत. या वर्षीच्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध ओरिगामी तज्ज्ञ मीनाक्षी मुखर्जी यांची उपस्थिती. या मूळच्या कोलकाताच्या, आता अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी अनेक ओरि-कलाकृती - विशेषत: मोड्युलर कुसुदामा, बॉक्सेस - निर्माण केल्या आहेत. त्यांची पाच पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. खास या प्रदर्शनासाठी त्यांनी एक ‘मयूर’ तयार करून या प्रदर्शनाला तो समर्पित केला आहे.

प्रदर्शनस्थळी ओरिगामी शिकण्यासाठी प्राथमिक व विशेष स्तराच्या ओरिगामी सशुल्क कार्यशाळाही घेतल्या जातील. त्यासाठी नावनोंदणी प्रदर्शनाच्या ठिकाणी करता येईल. कार्यशाळेसाठी कागद पुरवले जातील.

मी गुरु-शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत आणि शनि-रविवारी दिवसभर तिथे असेन. प्रदर्शनात ‘अॅक्शन ओरिगामी’च्या टेबलवर असेन.

सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण.

मिपाकरांची वाट पाहणारा
सर्वांचाच,
सुधांशुनूलकर
९८६९४२८५०३.

जाता जाता : समोरच पोलीस कँटीन (ग्रँड सेंट्रल कँटीन) आहे, तिथे खिमा, भेजा आणि काळजी छान मिळते. एक खादाडी कट्टाही होईल.

काही दुवे

ओरिगामी क्रेन्सवर लोकसत्तामध्ये लिहिलेला लेख

लोकप्रभाच्या १२ डिसेंबर २०१४च्या ताज्या अंकात पान ४४वरचा लेख

ओरिगामीविषयी मिसळपाववरचे माझे लेख
ओरिगामी
ओरिगामी - २
मी, ओरिगामी आणि सामाजिक पालकत्व

प्रास यांनी लिहिलेला ओरिगामी मिपाकट्ट्याचा वृत्तान्त

मीनाक्षी मुखर्जी याचं संकेतस्थळ