धागे / प्रतिसाद अप्रकाशित करण्याचे धोरणीय निकष

लोक्सहो, आम्ही नवीन संपादक झाल्यापासून अप्रकाशित करण्याचे निकष शोधत आहोत पण कुठे मिळेनात.
तेव्हा कुटंतरी कायदा लिवल्याला असावा म्हनून ह्यो धागा काढला. चर्चा करूनशान ठरवावे.
अप्रकाशित करताना काय पाहावे ?
१. धागा पाचोळी किंवा कमी-ओळी असेल तर सरसकट अप्रकाशित करावा काय ? सहसा कट्टा या विषयाचे धागे असेच असतात. त्यांचे काय ?
२. इतर संस्थळांची जाहिरात केली असल्यास / इतर संस्थळांचा नुसता दुवा दिल्यास
३. नुसता ब्लॉगचा दुवा किंवा जाहिरात असल्यास
४. अश्लील असल्यास
५. व्यक्तिगत टीका / भांडणे / टिंगल-टवाळी असल्यास
६. व्यावसायिक जाहिरात असल्यास. उदा. कुणी आपल्या उत्पादनाची / क्लासची / शिबीर अगर वर्गाची (शुल्क असलेल्या ) जाहिरात केली असल्यास
७. इतर आणखी काही .
हे एकदा फायनल झाल्यावर मिपाच्या 'धोरणात' लिहिता येईल. *smile*