श्वास गंध
तुझ्या विना सांज सखे, जीव ओशाळला
गच्च नभी हे चांदणे, अंधार मंद जाहला ||१||
सोसतो विरह मी, माझ्या श्वासा श्वासातला
अंतर श्वासा श्वासातले, एकांत कुंद जाहला ||२||
चंद्र शोधती तारका, सवे घेउनी अंबराला
तुझा पौर्णिमेचा चंद्र, माझा छंद जाहला ||३||
कधी नीज लागली, न कळे मुळी मला
सहवास विचार तुझा, स्वप्नात धुंद जाहला ||४||
जरी असेल स्वप्न, पाहिले असे तुला
श्वास हर एक माझा, तुझा गंध जाहला ||५||
-सार्थबोध