शुभ्र मोगर्‍याची कळी

शुभ्र मोगर्‍याची कळी

शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही कधी?
---
पहाटेच्या दवात भिजलेली
आता उमलावं की नको
या विवंचनेत गुंतलेली
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
पाहता पाहता पहाटेची सकाळ झाल्यावर
हलकेच डोळे मिचमिचे करुन
हिरवे हिरवे जग बघून
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
सकाळ कलंडतांना आळसाने
भरलेले डोळे चोळत
त्या एका वेड्याची वाट पाहणारी
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
तो आल्यावर पटकन
त्याच्यासमोर उडी घेणारी
लाजरी बुजरी
शुभ्र मोगर्‍याची कळी
पाहिलीये का हो तुम्ही?
----
तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना
गोळा करुन
एका सुंदरश्या गजर्‍यात माळून
जेव्हा तिला देतो
तेव्हा
त्याच्या समोरची
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
---
सांगाना
पाहिलीये का हो?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|