'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

म.न.से. ची तथाकथित ब्ल्यू प्रिंट आली एकदाची.
९ वर्ष काम चालू होत यावर.(म.न.से. स्थापन होऊन ८ वर्ष झाली; तारीख ९ मार्च २००६)
ते असो.

२००९ च्या निवडणुकीत म.न.से.नी 'वचकनामा' जाहीर केला होता,त्यावेळी 'मराठी' हा मुद्दा महत्वाचा होता;आणि "खळ फट्याक" ला साजेसा होता.

कालच्या जाहीरनाम्याच्या कव्हरवरचे ब्रीद वाक्य "हो हे शक्य आहे" आणि निळ्या रंगातला राज ठाकरे यांचा फोटो म्हणजे चक्क बराक ओबामाच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे.

म.न.से. च्या ब्ल्यू प्रिंट मध्ये मराठी हा मुद्दा अजून आहेच,त्याच बरोबर महाराष्ट्राला स्वायत्तता देऊ असा पण उल्लेख करून मात्र राज साहेबांनी अनेक प्रश्नांचे नवनिर्माण केले आहे.

महाराष्ट्र आत्ता कसा आहे मग ? केंद्रातील सरकारच्या परवानग्या घ्यायला जाणार नाही असा भाषणात उल्लेख !
मागच्या ६ महिन्यापूर्वी तर मोदींचे गुणगान करत होते ना साहेब तुम्ही ?

हे सगळे लोकांना कळायचे नाही का ?
अहो आपले सगळ्यात जास्त उमेदवार मुंबई, पुणे अश्या शहरी भागातले शिकलेले लोक आहेत त्यांना स्वायत्तता कळणार नाही का ?

हे म्हणजे भारतीय संविधानाला सुरुंग लावणे होईल. अहो फेडरल आणि युनियन यांचा मेळ घालून, संविधान बनवले आहे हो, आणि महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आपल्या संकेतस्थळावर पण नाही त्यात शेवटची अपडेट म्हणजे आपला मार्च महिन्यातला दौरा दिसतोय.
महाराष्ट्राच्या विकासात म न से एवढं मागे ?
कशी मतं द्यायची आम्ही ?