या विषयावर आधीच फार बोलून/लिहून झालेय, त्यामुळे मी आणखी काही जास्त लिहित बसत नाही. पण आता या सगळ्या गदारोळानंतर आताशा मलाही असं वाटू लागलंय की, या गोष्टीचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावलाच पाहीजे, उगा चर्चा नको!!
तर माननीय संपादकहो या धाग्यात संक्षीला बॅन करायचं कि नाही याचं होय किंवा नाही एवढ्या एकाच वाक्यात आपली मतं कळवाल अशी अपेक्षा करतो.
आणि हो, वेळोवेळी एखादा सदस्य चिथावला जातोय हे लक्षात आल्यावर वारंवार त्याला चिथवणारे धागे काढणार्या निराकार गाढवाचाही बॅनसाठी, किंवा निदान वॉर्निंग देण्यासाठी विचार व्हावा.
संक्षीला बॅन करण्यासाठी माझे मत : नाही