(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…

टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली.

माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला.

त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले. पुन्हा पंधरा मिनिटांनी या महाशयांनी माझ्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी रात्री या 'चिंटुमामा' ला माझी अशी काय गरज लागली कि त्याने मला पुन्हा संपर्क केला या विचारात मी (अर्थातच चडफडत) माझा भ्रमणध्वनी ऊचलला.

तिकडून हे महाशय बोलले, "मी राजेश बोलतोय. कसा आहेस?" राजेश नावाच्या कोणत्याही माणसाला मी ओळखत नाही हे माझ्या लक्षात आले. माझ्याकडुन काही ऊत्तर आले नाही हे बघुन हे महाशय पुन्हा म्हणाले, "मी राजेश राजे बोलतोय. विसरलास का मला?" तेव्हा माझी टयुब पेटली. अरे बापरे, राजे काका! साडेसहा फुट ऊंच माणुस चिंटु कसा असु शकतो? मी पटकन म्हणालो, "राजे काका, कसे आहात?" राजे काका हसुन म्हणाले, "ऊद्या भेटायला जमेल का तुला?" जास्त आढेवेढे न घेता मी त्यांना ऊद्या भेटायचे कबुल केले.

दुसऱ्या दिवशी त्यांना भेटल्यावर त्यांनी (अर्थातच) मी काल रात्री त्यांचा पहिला कॉल का ऊचलला नाही हे पहिले विचारले. मी त्यांना चिंटुमामा आणि माझ्या भ्रमणध्वनीवरच्या टृ कॉलर पद्धल सांगितले. माझ्याकडे पहात ते हसत म्हणाले, "मला लहानपणी सगळे चिंटु या नावाने हाक मारायचे. कदाचित माझ्या भाच्याने माझ्या भ्रमणध्वनी क्रमांकाची चिंटुमामा म्हणुन नोंद केली असेल."

माझ्या संपर्क यादी मध्ये मी एखाद्या क्रमांकाची नोंद छोटु काका म्हणुन केली असेल तर टृ कॉलर तेच नाव ऊचलुन घेतो. मग त्याने (टृ कॉलर असलेल्या) कोणालाही संपर्क केला तर त्याचे नाव छोटु काका म्हणुन दाखवतो.

असा किंवा यासारखा किस्सा तुमच्या बाबतीत घडला असेल तर अवश्य सांगा!