वाचनमात्र नवा रोल.

परवा व्हॉट्सपवर गविंनी एक कल्पना मांडली होती. एक असा नवा रोल तयार करायचा ज्यातील सदस्यांना फक्त वाचनमात्र रहाता येईल. म्हणजे त्याला लॉगईन करता येईल पण कुठेही लिहिण्यास मज्जाव असेल. मग तो एखादा प्रतिसाद असो वा खव/खफ वा व्यनि अगदी नवं लेखनही.
जे सदस्य केवळ दंगा करण्यात धन्याता मानतायत त्यांना ७ ते १० दिवस या रोल मध्ये ढकलायचं. त्या नंतरही जर सुधारले नाहीत तर मग कडक कारवाई जसं तात्पुरतं वा कायमचं निलंबन.

प्रशांतशी आत्ताच बोललो तो म्हणाला असा रोल तयार करणे शक्य आहे.

तेव्हा या कल्पने बाबत आपलं मत कळवा. जर काही बदल अस्तील सुचना असतील तर त्याही कळवा.