गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी मुंबईत झाल्या. कामाची वेळ रात्रीची असल्याकारणाने, दिवसा घरीच होतो अन् एकदम पावसाची सर आली. मग घेतला कॅमेरा आणि राहिलो उभा खिडकीत या आशेने. फोटो तसे काही मिळाले नाहीत पण, ही भिजून चिंब झालेली चिमणी तेवढ्यात खिडकीजवळ आली आणि कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट झाला...
