पडघम- २०१४ भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक

राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक या लेखाने पडघम-२०१४ या लेखमालेची सुरवात करत आहे. या लेखमालेसाठी १९८९ पासून सर्व निवडणुकांच्या आकडेवारीचा उपयोग करणार आहे. ही आकडेवारी जमा करायला मी सुरवात केली होती गेल्या वर्षीपासून.गेल्या २-३ महिन्यात ज्ञानोबाचे पैजार, पैसाताई, राहुलजीव्ही, सुहासदवन आणि श्रीरंग जोशी यांनी ही आकडेवारी एकत्र करायला महत्वाची मदत केली. या मिपाकरांच्या मदतीमुळेच ही लेखमाला पूर्ण होणार आहे त्यामुळे त्यांचे सर्वप्रथम आभार मानून या लेखमालेला सुरवात करतो.

या भागात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानात फरक असतो का या प्रश्नाचे उत्तर शोधू. माझा दावा आहे की प्रादेशिक पक्ष आणि छोटे पक्ष/अपक्ष हे विधानसभा निवडणुकांमध्ये जितकी चांगली कामगिरी करतात तितकी चांगली कामगिरी लोकसभा निवडणुकांमध्ये करत नाहीत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकांपेक्षा लोकसभा निवडणुकांमध्ये अधिक चांगली कामगिरी करतात. इथे राष्ट्रीय पक्ष विरूध्द प्रादेशिक पक्ष अशी तुलना केली जात नसून नसून पुढे दिल्याप्रमाणे दोन तुलना केल्या जात आहेत:

१. राष्ट्रीय पक्षांची लोकसभा निवडणुकांमधील कामगिरी विरूध्द राष्ट्रीय पक्षांची विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी
२. प्रादेशिक पक्षांची लोकसभा निवडणुकांमधील कामगिरी विरूध्द प्रादेशिक पक्षांची लोकसभा निवडणुकांमधील कामगिरी

अनेकदा असे वाटते की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एका वर्षाच्या आत लगेचच लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्वसाधारणपणे लोकसभेत लागलेलेच निकाल परत लागतील. ढोबळ मानाने हा निष्कर्ष बरोबर आहे.पण मतांच्या टक्केवारीकडे बघितले तर या ढोबळ मानाने उभ्या राहिलेल्या चित्रापेक्षा आपल्याला आणखी काही गोष्टी कळतील.त्या गोष्टी कोणत्या हे बघण्यापूर्वी आपण तो विदा बघू.

खाली दिलेल्या तक्त्यांमध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर दोन वर्षात आत विधानसभा निवडणुका झाल्या अशी काही राज्ये (गेल्या २० वर्षातील) निवडली आहेत.खाली दिलेल्या तक्त्यामध्ये पुढील माहिती दिली आहे:

१. विधानसभा मते% : विधानसभा निवडणुकांमध्ये विविध पक्षांना मिळालेली मते
२. लोकसभा मते%: लोकसभा निवडणुकांमध्ये विविध पक्षांना मिळालेली मते
३. मतांमधील फरक: लोकसभा निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत किती जास्त मते मिळाली
४. विधानसभा जागा विजय: विधानसभा निवडणुकांमध्ये विविध पक्षांनी जिंकलेल्या जागा
५. विधानसभा मतदारसंघ आघाडी: लोकसभा निवडणुकांमध्ये विविध पक्षांनी किती विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली
६. जागांमधील फरकः विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकांमध्ये विविध पक्षांनी किती जास्त जागांमध्ये आघाडी मिळवली

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

मध्य प्रदेश२००८-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३७.६%४३.४%५.८%१४३१२२-२१
कॉंग्रेस३२.४%४०.१%७.७%७११००२९
बसप९.०%५.९%-३.१%७७०
अपक्ष आणि इतर२१.०%१०.६%-१०.४%९१-८
       
राजस्थान२००८-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३४.३%३६.६%२.३%७८४२-३६
कॉंग्रेस३६.८%४७.२%१०.४%९६१४४४८
बसप७.६%३.४%-४.२%६०-६
अपक्ष आणि इतर२१.३%१२.८%-८.५%२०१४-६
       
दिल्ली२००८-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३६.३%३५.२%-१.१%२३२-२१
कॉंग्रेस४०.३%५७.१%१६.८%४३६८२५
बसप१४.०%५.३%-८.७%२०-२
अपक्ष आणि इतर९.४%२.४%-७.०%२०-२
       
छत्तिसगड२००८-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप४०.३%४५.०%४.७%५०६०१०
कॉंग्रेस३८.६%३३.७%-४.९%३८२३-१५
बसप६.१%४.३%-१.८%२१-१
अपक्ष आणि इतर१५.०%१७.०%२.०%०६६
       
मध्य प्रदेश२००३-०४     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप४२.५%४८.१%५.६%१७३१८७१४
कॉंग्रेस३१.६%३४.१%२.५%३८३८०
बसप७.३%४.८%-२.५%२२०
अपक्ष आणि इतर१८.६%१३.०%-५.६%१७३-१४
       
राजस्थान२००३-०४     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३९.२%४९.०%९.८%१२०१४०२०
कॉंग्रेस३५.६%४१.५%५.९%५६५८२
बसप४.०%३.२%-०.८%२०-२
अपक्ष आणि इतर२१.२%६.३%-१४.९%२२२-२०
       
दिल्ली२००३-०४     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३५.२%४०.७%५.५%२०१४-६
कॉंग्रेस४८.१%५४.८%६.७%४७५६९
बसप५.८%२.५%-३.३%२०-२
अपक्ष आणि इतर१०.९%२.०%-८.९%१०-१
       
छतिसगड२००३-०४     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३९.३%४७.८%८.५%५०७३२३
कॉंग्रेस३६.७%४०.२%३.५%३७१७-२०
बसप४.४%४.५%०.१%२०-२
अपक्ष आणि इतर१९.६%७.५%-१२.१%१०-१
       
कर्नाटक२००८-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप३३.९%४१.६%७.७%११०१४०३०
कॉंग्रेस३४.८%३७.६%२.८%८०६२-१८
जनता दल (ध)१९.०%१३.६%-५.४%२८२२-६
अपक्ष आणि इतर१२.३%७.२%-५.१%६०-६
       
हिमाचल प्रदेश२००७-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप४३.८%४९.६%५.८%४१४८७
कॉंग्रेस३८.९%४५.६%६.७%२३२०-३
अपक्ष आणि इतर१७.३%४.८%-१२.५%४०-४
       
गुजरात२००७-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
भाजप४९.१%४६.५%-२.६%११७१०५-१२
कॉंग्रेस३८.०%४३.४%५.४%५९७६१७
अपक्ष आणि इतर१२.९%१०.१%-२.८%६१-५
       
कर्नाटक१९९४-९६     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरक   
जनता दल३३.५%३४.९%१.४%   
भाजप१७.०%२४.८%७.८%   
कॉंग्रेस२७.०%३०.३%३.३%   
कर्नाटक कॉंग्रेस पक्ष७.३%३.१%-४.२%   
अपक्ष आणि इतर१५.२%६.९%-८.३%  

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #E2E8EE;
color: #FFF;
font-weight: bold;
}

उत्तर प्रदेश२००७-०९     
 विधानसभा मते%लोकसभा मते%मतांमधील फरकविधानसभा जागा विजयविधानसभा मतदारसंघ आघाडीजागांमधील फरक
सप२५.४%२३.३%-२.१%९७११८२१
बसप३०.४%२७.४%-३.०%२०६१००-१०६
भाजप१७.०%१७.५%०.५%५१६२११
कॉंग्रेस८.६%१८.३%९.७%२२९५७३
अपक्ष आणि इतर१८.६%१३.५%-५.१%२७५०२३

यातून आपल्याला पुढील गोष्टी दिसतील:

१. विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष/लहान पक्ष आणि अपक्ष यांच्याकडील मते राष्ट्रीय पक्षांकडे जातात हे स्पष्टपणे आपल्याला दिसते. हा कल अगदी उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही (दोन मुख्य राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा नसलेल्या राज्यातही) दिसतो.

आता प्रश्न हा की प्रादेशिक पक्ष/अपक्ष यांची कमी झालेली मते नक्की कोणत्या राष्ट्रीय पक्षाला जातात.

२. सर्वसाधारणपणे विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेला कल लोकसभेमध्ये कायम राहतो.पण विधानसभेमध्ये विजयी झालेल्या पक्षाला विधानसभेत पराभूत झालेल्या पक्षापेक्षा अधिक मते आपल्याकडे खेचता येतात. उदाहरणार्थ राजस्थानात डिसेंबर २००८ मध्ये कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुका जिंकला.पण २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला आपल्याकडे १०.४% मते तर भाजपला केवळ २.३% मते आपल्याकडे खेचता आली.यातून परिणाम काय झाला? तर लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने २५ पैकी २० जागा जिंकल्या तर भाजपने अवघ्या ४. चारच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची इतकी वाईट अवस्था झाली नव्हती. पण लोकसभेत अशी वाईट अवस्था झाली याचे कारण अपक्ष/लहान पक्ष यांच्याकडून कॉंग्रेसने भाजपपेक्षा आपल्याकडे बरीच जास्त मते खेचून आणली होती. असेच इतर राज्यांविषयीही लिहिता येईल.

छत्तिसगडमध्ये २००८-०९ या काळात अपक्ष आणि इतर यांची मते वाढलेली दिसत आहेत.याचे कारण आहे. दुर्ग लोकसभा मतदारसंघातून ताराचंद साहू यांनी बंड करून भाजप उमेदवाराविरूध्द निवडणुक लढवली (ताराचंद साहू २००४ मध्ये दुर्ग मधून लोकसभेवर निवडून गेले होते.पण त्यांचे पक्षनेतृत्वाबरोबर मतभेद झाले). त्यांना २ लाख ६१ हजार ८७९ मते मिळाली तर राज्यात एकूण मिळालेली मते होती ८५ लाख ५२ हजार ५४१. तेव्हा एकट्या ताराचंद साहू यांनी राज्यातील एकूण मतदानापैकी ३.१% मते मिळवली.छोट्या राज्यांमध्ये असा एखादा तगडा अपक्ष उमेदवार अशा प्रकारचा परिणाम घडवू शकतो. जेव्हा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये थोडा अधिक फरक असतो तेव्हा या कलाच्या थोडा वेगळा कल बघायला मिळू शकतो (उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश-२००७ ते २००९, गुजरात २००७ ते २००९).

कारणे

पण प्रादेशिक/छोटे पक्ष आणि अपक्ष हे विधानसभेत जितकी चांगली कामगिरी करतात तितकी चांगली कामगिरी लोकसभा निवडणुकांमध्ये करत नाहीत असे का होत असावे याविषयीचे माझे मत व्यक्त करून पहिल्या लेखाची सांगता करतो. याविषयी माझ्या मते दोन कारणे आहेत.

१. विधानसभा निवडणुकांसाठी मतदार राज्य पातळीवरच्या मुद्द्यांचा विचार करतात तर लोकसभा निवडणुकांसाठी देश पातळीवरच्या मुद्द्यांचा. देशपातळीवरील मुद्द्यांसाठी राष्ट्रीय पक्ष अधिक लोकांना अधिक योग्य वाटतात तर राज्यपातळीवरील मुद्द्यांसाठी प्रादेशिक पक्ष अधिक लोकांना अधिक योग्य दिसतात.

२. लोकांना विजयी व्हायची शक्यता कमी असलेल्या उमेदवाराला मत देऊन आपले मत फुकट घालवायचे नसते.एक कल्पना करू की आपण दहा इमारती असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये राहत आहोत आणि आपल्या इमारतीतला एक रहिवासी कॉंम्प्लेक्सच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी उभा राहिला.या परिस्थितीत ’आपला’ उमेदवार निवडून यायची शक्यता आहे म्हणून मी माझे मत माझ्या इमारतीमधील उमेदवाराला देईन. पण समजा तोच रहिवासी महापालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला तर तो निवडून यायची शक्यता बरीच कमी होईल.तेव्हा शक्यतो मला माझे मत फुकट घालवायला आवडणार नाही.तेव्हा मी कदाचित माझे मत दुसऱ्या उमेदवाराला देईन.समजा तोच उमेदवार विधानसभा किंवा लोकसभेला उभा राहिला तर तो उमेदवार निवडून यायची शक्यता आणखी कमी होईल त्यामुळे त्या उमेदवाराचे अगदी कट्टर समर्थक वगळता इतर लोक त्या उमेदवाराला मत देणार नाहीत.

राष्ट्रीय पक्षांची लोकसभा निवडणुकीत आणि पविधानसभा/लहान पक्षांची/अपक्षांची विधानसभा निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी हा कल बघायला मिळाला आहे.जर कोणा मिपाकराला इतर राज्यांविषयीचा विदा हवा असेल तर प्रतिसादांमध्ये जरूर लिहावे.तो मी तिथेच देईन.

लेखमालेच्या दुसर्‍या भागात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्यास परिस्थिती कशी बदलते हे बघू.