होळी, धूळवड, रंगपंचमी

नमस्कार,

होळी, धूळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा. या निमीत्ताने विकिपीडिया करता लागणार्‍या मुक्त छायाचित्रांच्या विकिमीडिया कॉमन्स या ऑनलाईन संग्रहाचा थोडक्यात परिचय करून द्यावा असा उद्देश आहे. उदाहरणार्थ होळी हा लेख इंग्रजी आणि भारतीय भाषा आणि इंग्रजी विकिपीडियावर आहेच पण त्या सोबत अगदी कोरीयन नॉर्वेजीयन अशा भाषात देखील आहे. आपण विकिमीडिया कॉमन्स या संयुक्त प्रकल्पात एखादे छायाचित्र चढवले की प्रत्येक भाषेतील विकिपीडियात वेगळे चढवावे लागत नाही. त्यामुळे अजून नवीन इतर नवीन भाषेत लेख अनुवादीत झाला तर त्या भाषेत त्या देशात आपली संस्कृती माहिती होण्यास हातभार लागतो. भारतातील पर्यटन विकासास अप्रत्यक्ष मदतही होऊ शकते. अर्थात त्या करता महाराष्ट्रीय संस्कृतीच्या संदर्भाने असलेल्या छायाचित्रांची मोठी कमतरता भासते.

मी आणि इतर बरीच मि.पा.कर मंडळी विकिमीडिया कॉमन्सवरील छायाचित्रे मिपावर वापरत असतोच. मी विकिमीडिया कॉमन्सवरील होळी, धूळवड, रंगपंचमीची सध्याची काही चित्रे खाली दाखवतो. त्या खाली विकिमीडिया कॉमन्सवर छायाचित्रे कशी चढवावीत याची माहिती देतो.

*Radha, Krishna and sakhis playing Holi. Lucknow, Avadh (Oudh), 19th century. Opaque watercolor and gold on paper,
**A painting from the collection of Smithsonian Institute depicting Krishna-Radha and Gopis celebrating Holi
Radha and Gopis

*बेल्जीअम मध्ये साजरी झालेली एक रंग पंचमी
Belgium holi

*
After_Holi_Colors_a_Namaste,_So_i'll_spread_out_my_wings

After_Holi_Colors_a_Namaste

*The Hindu festival of Holi Celebrations and partying on Holi in Germany 2012
Holi Germany

*
A_celebration_of_Holi_Festival_of_Colors,_Utah_United_States_2013

Utah USA

* होळी पर्व, नेपाळ

Holi Nepal

विकिमीडीया कॉमन्स येथून छायाचित्रे अपलोड करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. प्रथमतः बहुभाषिक प्रकल्प असल्याने किमान मेनू वगैरे मराठीतून वापरणे मराठी टंकन सुविधा इत्यादी बाबी तेथे उपलब्ध आहेतच. त्याकरीता साईन इन केल्या नंतर (पर्सनल) Preferences मध्ये Internationalisation >> लँग्वेज मध्ये मराठी निवडावी मराठी टंकनाकरीता विकिची सुविधा वापरावयाची झाल्यास त्या खालीच असलेला Enable the Universal Language Selector हा पर्याय निवडावा.

छायाचित्र अपलोडकरण्या साठी इतर सुविधा उपलब्ध आहेत पण मला स्वतःला Upload Wizard हि विशेष सुलभ सुविधा वापरणे आवडते. प्रिफरन्सेस मध्ये मराठी निवडल्यास सुविधा चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) नावाने मराठीतही उपलब्ध होते.

कॉमन्सवर मुखपृष्ठाची मराठी आवृत्ती उपलब्ध आहे. त्याच्याच चर्चा पानवर मराठी आणि महाराष्ट्र संबंधित प्रमूख वर्गिकरणांचे दुवे उपलब्ध केले आहेत.

मराठी विकिपीडियावर आणि बंधूप्रकल्पात मराठी आंणि महाराष्ट्रीय संस्कृती विषयक छायाचित्रांची मोठी कमतरता आहे. जसे की समई महाराष्ट्रातील पारंपारीक जेवणाची पंगत मराठी सण इत्यादी साधी साधी छायाचित्रे सुद्धा उपलब्ध नाहीत. हवे असलेल्या चित्रांचे वर्गीकरण वर्ग:चित्र हवे येथे होते. त्या संबंधाने मराठी विकिपीडियावर प्रकल्प पान सुद्धा विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे सुद्धा आहे. कॉपीराईट बद्दल एक सदस्य चर्चा पान उपलब्ध आहे परंतु कॉमन्स मधून
चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) वापरल्यास लायसन्सींग आणि त्यासंबंधी आणि इतर बर्‍याच गोष्टी पाहता पाहता होऊन जातात. छायाचित्र चढवल्या नंतर विकिपीडियावर चित्र कसे लावावे हे लगेच त्याचा ही दुवा उपलब्ध होतोच पण तरीही केवळ [[चित्रःचढवलेल्या छायाचित्र फाइल संचिकेचे नाव]] एवढे लिहिले आणि कॉमन्सवर छायाचित्र असेल तर सर्व भाषेतील हव्या त्या विकिपीडिया लेखात आणि बंधूप्रकल्पातील कोणत्याही लेखात सहजतेने करता येते.