प्रस्ताव २०१४

नमस्कार नीलकांत, संपादक-सल्लागार मंडळी:

चावडीवरील नीलकांतचे आप संदर्भातील प्रतिसाद आणि चर्चा वाचताना जे डोक्यात आले ते प्रस्ताव म्हणून खाली लिहीत आहे:

नमनाचे तेलः सध्या मिपावर भारतातील सद्यस्थितीतील राजकारणावरून अनेक लेख येत आहेत आणि भरपूर प्रतिक्रीया देखील येत आहेत. आप चांगले आहे का नाही हा प्रश्न नसून आप कडनं झालेल्या धडधडीत चुकांकडे आणि चालूगिरीकडे देखील खर्‍या अर्थाने सुशिक्षित असलेल्या तरूण तसेच॑ एकंदरीत मध्यमवर्गीय समाजास दुर्लक्ष करावेसे का वाटत आहे हा मुद्दा लक्षात घ्यावा. उत्तर सिंपल आहे: लोकं गांजली आहेत आणि त्यांना या सोकॉल्ड व्यवस्थेचा, प्रस्थापित पक्षाचा कंटाळा आला आहे. या संदर्भात कुठल्याही व्यक्तीस दोष देता येणार नाही. पण त्यामुळे एक मुद्दा नक्की आहे: २०१४ च्या निवडणुका ह्या १९७७ च्या निवडणुकांनंतरच्या ऐतिहासीक निवडणुका ठरणार आहेत. कदाचीत संपादकांपैकी अनेकजण तेंव्हा जन्माला देखील आले नसतील पण माझ्यासारखे जे कोणी असतील त्यांना त्यावेळेस (मी होतो तसा) २-३ यत्तेत असतील त्यांना देखील तो काळ आठवत असेल. त्यावर अधिक नंतर कधीतरी... तुर्तास मुद्दा असा आहे की या निवडणुकांच्या संदर्भात आपण काही करू शकतो का?

या संदर्भात काही गोष्टी सुचवत आहे, त्यावर जे काही वाटेल ते अवश्य सांगा अगदी टिका देखील. कारण यात माझ्यासाठी व्यक्तीगत काहीच नाही आहे....

  1. अगदी साधे म्हणजे आपण २०१४ निवडणुकांसाठी वेगळे सदर चालू करून सर्व संबधीत लेख तेथे एकत्र करू शकतो.
  2. "मिपा व्यवस्थापन" म्हणून त्यात कुठल्याच पक्षाची बाजू घेऊ नये अथवा कोणाला मते द्या हे सांगायला जाऊ नये, हे आपणास सांगण्याची गरज नाही.
  3. नुसते विविध पक्षांवर, नेत्यांवर ताशेरे ओढणारे लेखच त्यात नसतील तर काहीतरी भरीव असेल ज्याचा झाला तर किंचित उपयोग मतदान वाढायला होऊ शकतो.
  4. पण आपण किमान मराठी तरूण आणि मिपाकरांना निवडणुका, नागरी हक्क - जबाबदार्‍या, मतदान आदींसाठी मोबिलाइझ्ड करू शकतो का हे बघणे
  5. व्होटर रजिस्ट्रेशन केले आहे का हे विचारणे, त्यासंदर्भात आलेल्या अडीअडचणी, अनुभव आदी लिहायला सांगणे
  6. त्यात या संदर्भातील विविध माहिती एकत्र करता येईल आणि लोकांपर्यंत पोचवता येईल.
  7. मिपाकरांना त्यांची विशलिस्ट (रिगार्डलेस ऑफ पॉलॉटीकल पार्टी) विचारता येईल
  8. शक्य झाल्यास विविध प्रमुख पक्षांना त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल मोजक्या(५००-१०००) शब्दात लिहून भुमिका सांगायला लावता येतील.
  9. अजूनही बरेच करता येईल... तुर्तास विचाराला चालना देण्यासाठी इतकेच :)

जाता जाता, गंमत म्हणून खालील नकाशा बघा... मी तयार केला आहे. टिंबावर क्लिक केल्यावर बरीच माहिती मिळेल. योग्य वेळेस पब्लीकसाठी पण ओपन करेनच. तेंव्हा तुर्तास बाहेर शेअर करू नये ही विनंती. :)