पैसाताईचा धागा अगदी भरुन वाहू लागल्याने हा नवा धागा काढत आहे.
आपण सर्वजण दिवाळी अंक पाहू शकतो अन काही दुरुस्ती असतील तर त्या सुद्धा येथे तसे नमूद करुन करु शकतो.
मालकांनी सुधांशु नूलकर अन अभिजीत देशपांडेंना अॅक्सेस दिल असेल असे गृहीत धरुन मी नूलकरांना दिवाळी अंक नजरेखालुन घालण्यास सांगितले आहे. म्हणजे मेल ने लेख पाठवण्याऐवजी ते येथेच येउन आवश्यक त्या दुरुस्ती करतील अशी अपेक्षा.
ज्या वेगवेगळ्या लिंक्स आहेत त्या चढवायला ज्या कुणाला जमत असेल त्यांनी प्लिज मदत करा.
संपादन ही सुविधा आपल्या अंकाच्या नजरेतून सुटलेल्या चुकांसाठी आहे. फक्त तसे केले आहे हे येथे लिहुन जा म्हणजे त्याचा ट्रॅक राहील.
मालकांना दिवाळी अंक साफ करुन दिल्याबद्दल धन्यवाद.