दिवाळी अंक

दिवाळी अंकाचे काम सुरू करायला आधीच उशीर झाला आहे. आता मिपा नीट चालेल असे समजून कामाला सुरुवात करूया. मला वाटते एक जाहीर निवेदन देऊन लेख कविता इ. मागवावेत. शिवाय आपल्या संपर्कात असल्लेल्या मंडळीना प्रत्येकाने लिहायला सांगावे.

रांगोळ्या आणि आकाशकंदिलाची स्पर्धा घ्या अशी सूचना एका वाचकाकडून आली आहे. त्याचबरोबर गणपती स्पर्धेचा निकाल पेंडिंग आहे. आज उद्यात तो लावला पाहिजे.

अपर्णा आणि रेवती यांच्याशी फेसबुकवर किंचित बोलणे झाले. गविंना ऑफिसमधे मिपा बॅन आहे. सलग वेळ देणे कठीण आहे असे व्हॉट्स अ‍ॅपवर बोलणे झाले. तुमची सगळ्यांची मते काय? अपर्णाला सकाळी वेळ मिळत असेल तर अंकाची जबाबदारी घेऊ शकेल का? आम्ही सगळे मदतीला आहोतच.