उत्सव

नमस्कार,
आता अन्न हे पूर्णब्रह्म सदर संपल्यामुळे सानिकानं दिलेली रेसिपी व खिडकी बंद केली तरी चालेल. त्या जागी गणपती उत्सवाच्यानिमित्ताने काही स्पर्धा, उदा. रांगोळी, सजावट, घरच्या गणपतीचा फोटू, घरी तयार केलेले मखर, हस्तकला इ. टाकण्याबाबत जाहिरात करायची असल्यास करूयात. तुम्हा सगळ्यांना यबद्दल काय वाटते? कालच झालेल्या दोन मोठ्या व्यक्तींच्या शोकाचा संदेश अजून एखाद दोन दिवस तिथे राहील व नंतर तो काढून मगच या उत्सवी जाहिरातीला सुरुवात करूयात असे वाटते. नंतर मात्र आपल्याला दिवाळी अंकासाठीचे साहित्य गोळा करणे भाग आहे. त्याची जाहिरात करावी लागेल. कृपया दोनेक दिवसात गणपतीबद्दल काही ठरवावेच लागेल. मदनबाण दरवर्षी उत्साहाने त्याच्या घराजवळच्या गणपती मंडळांचे फोटू मिपावर टाकत असतो. त्याचा काही उपयोग करावा काय? मीनल या आयडीने मागील वर्षी जास्वंदीच्या कळ्यांची मस्त सजावट करण्याची कृती मिपावर दिली होती त्यासाठी तिला विनंती करावी काय? मला अजून एखादा दिवस इंटरनेट नक्कीच उपलब्ध आहे. नंतर मात्र खात्री देता येणार नाही. कदाचित पुढच्या महिन्यातच येता येईल.
धन्यवाद.