साहित्यः
१ वाटी मैदा
१/४ वाटी ताजा खवा / मावा
२ टेस्पून साजूक तूप
३-४ टेस्पून काजू+बदाम+पिस्त्याची पावडर
१ वाटी साखर + २ टेस्पून खव्यात मिसळण्यासाठी (साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी - जास्त करणे)
१ टीपून बदामाचे काप
१ टीस्पून पिस्त्याचे काप
१/४ टीस्पून केशर
१/२ टीस्पून वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी (ऐच्छिक)
पाकृ:
मैद्यात तुपाचे मोहन घालून, थंड पाण्याने साधारण घट्ट पीठ भिजवावे.
पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे.
नॉन - स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर कोरडाच , बदामी रंगावर परतून घ्यावा.
गॅस बंद करून वेगळ्या भांड्यात काढावा व हलका कोमट असतानाच त्यात सुकामेव्याचीपूड मिक्स करुन घ्यावी.
खवा पूर्ण थंड झाला की त्यात २ टेस्पून साखर व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करुन घ्यावे. एक गोळा घेऊन, चपटा करुन त्याची पारी तयार करून घ्यावी.
त्यात चमच्याने खव्याचे सारण भरुन, कडा उचलून बंद करुन घ्याव्यात.
हलकेच तळहातावर चपटे करुन घ्यावे, लाटायचे नाही.

वनस्पती तूप गरम करुन घ्या व हल्क्या हाताने कचोर्या त्यात सोडून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
कचोर्या खुसखूशीत झाल्या पाहिजेत.
तळलेल्या कचोर्या पेपर टॉवेल वर काढून घ्याव्यात.
एक वाटी साखर + १/२ वाटी पाणी + केशर + वेलचीपूड एकत्र करुन २ तारी पाक तयार करुन घ्यावा.
पाक गरम असतानाच त्यात कचोर्या घोळवून घ्याव्यात.
तयार कचोर्यांवर चांदीचा वर्ख लावून, बदाम+पिस्त्याचे काप पेरावे.

राजस्थानी मावा कचोरी खाण्यासाठी तयार आहे.