राजस्थानी मिश्र डाल आणि बेसन पुरी

Rajasthani-Dal-Puri

मिश्र डाळीसाठी साहित्यः

चणा डाळ १/४ वाटी
अख्खे मसूर १/४ वाटी
उडीद डाळ १/४ वाटी
तूर डाळ १/४ वाटी
मुग डाळ १/४ वाटी
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
तिखट १ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा
आलं १"
टोमॅटो १ मध्यम
कोथिंबीर मुठभर
मीठ चवीनुसार.
साजूक तुप २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून)

तयारी: सर्व डाळी धुवून घ्या. आलं बारीक चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबीर चिरुन घ्या.

कृती:

सर्व डाळी + हळद कुकर मध्ये घालून त्यात ५ वाट्या पाणी घाला आणी ५ शिट्ट्या होऊ द्या.
डाळी शिजल्यावर जरा (जास्त नाही) घोटून घ्या. मीठ घालून ढवळा.
आता एका फ्राय पॅन मध्ये साजूक तूप घेऊन ते तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की त्यात आलं घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो घालून परता. तिखट घाला. त्यावर कोथिंबीर घालून परता. हे सर्व आता डाळीवर ओतून नीट मिसळा.

पुर्‍यांसाठी साहित्यः

बेसन १ वाटी
जीरं १/२ लहान चमचा
कलोंजी १/४ लहान चमचा
हिंग १/४ लहान चमचा
तिखट १ लहान चमचा
आमचुर पावडर १ लहान चमचा.
कोथिंबीर मुठभर
राईचे तेल १ मोठा चमचा (टेबल स्पून)

कृती:

सर्व जीन्नस मिसळून आवशक्यतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ मळा आणि पुर्‍या लाटून तळा.

लोणच्याबरोबर सादर करा.

शुभेच्छा..!

ही डाऴ चवीला कांही ग्रेट लागत नाही. पण सर्व डाळींचे मिश्रण असल्याकारणाने आरोग्यदायी आहे. आठवड्यातून एकदा करावीच.

पुर्‍यांचा आनंद घेण्यासाठी डाळ हवीच असे नाही. ह्या पुर्‍या नुसत्या लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर, चहाला साथसंगत म्हणूनही, मस्तं लागतात.