बेसनवाली भरवाँ मिर्च

Rajasthani-Mirachi-Bhaji

साहित्यः

भावनगरी मिरच्या १५० ग्रॅम (अंदाजे १० मिरच्या).

मिरचीत भरण्यासाठी:

तेल १.५ मोठा चमचा (टेबल स्पून).
मोहरी १/२ लहान चमचा. (टी स्पून).
मेथीचे दाणे १/२ लहान चमचा.
हिंग चिमुटभर.
चण्याचे पीठ ४ मोठे चमचे.
हळद १/२ लहान चमचा.
आमचुर पावडर २ लहान चमचे.
धण्याची पावडर १ लहान चमचा.
गरम मसाला पावडर १ लहान चमचा.

कालवणासाठी (ग्रेव्हीसाठी):

तीळ २ मोठे चमचे.
ओल्या नारळाचा चव ४ मोठे चमचे.
तेल २ मोठे चमचे,
हिंग १/४ लहान चमचा.
जीरं १/२ लहान चमचा.
मोहरी १/२ लहान चमचा.
लवंग ६ नग.
कढीलिंबाची पाने ५-६ नग.
गरम मसाला १/२ लहान चमचा.
मीठ चवीनुसार.
लाल तिखट १/२ लहान चमचा.
हळद १/२ लहान चमचा.
धण्याची पावडर १/२ लहान चमचा.
चिंचेचा कोळ चवीनुसार.
साखर १/२ लहान चमचा.

कृती:

मिरच्यांना एकाबाजूने चीर द्या.

तेल तापवून मेथी आणि मोहरी टाकून तडतडू द्या. आता हिंग घाला. मंद गॅस करून चण्याचे पीठ आणि मिरच्या भरण्यासाठी असणारी सारी सामग्री त्यात टाकून परता. खमंग वास सुटे पर्यंत परता. हा मसाला गॅसवरून उतरवून थंड करून मिरच्यांमध्ये भरा. ह्या भरलेल्या मिरच्या बाजूला ठेवून द्या.

तीळ आणि ओला नारळ परतून मिक्सर मधून मुलायम पेस्ट करा.
आता तेल तापवा जींरं आणि मोहरी टाकून तडतडवून घ्या. जीरं, मोहरी तडतडली की हिंग घाला. आता त्यावर लवंगा टाका. त्यावर भरलेल्या मिरच्या घालून परतून घ्या, तीळ आणि नारळाची पेस्ट घालून परता. कालवणासाठी असणारी सर्व सामग्री घालून त्यावर चिंचेचा कोळ आणि १ कप पाणी घालून मिरच्या शिजवा. गरज भासल्यास अजून पाणी घालण्यास हरकत नाही. शेवटी छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे कालवण झाले पाहिजे.
गॅसवरून उतरवून कोथिंबीरीने सजवा.

गरम गरम भाताबरोबर किंवा पोळ्यांबरोबर आस्वाद घ्या.

शुभेच्छा...!